आयएएस, आयपीएस होण्याचा प्रवास खूप कठीण आहे. हे पद मिळविण्यासाठी, UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्यासाठी, इतर सर्व काही विसरून वर्षानुवर्षे रात्रंदिवस अभ्यास करावा लागतो. ही नोकरी देशातील सर्वोच्च नोकऱ्यांपैकी एक आहे. अनेक भारतीय तरुणांचे आयएएस, आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न असते. परंतु असे काही तरुण आयएएस, आयपीएस अधिकारी आहेत ज्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि यशस्वी उद्योजक बनले. पाचही आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांनी नागरी सेवा सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू केला.
रोमन सैनी- त्याने 2014 मध्ये पहिल्याच प्रयत्नात IAS परीक्षा पास केली होती. रिपोर्ट्सनुसार, ते त्यावेळी सर्वात तरुण आयएएस अधिकारी होते. मात्र, काही वर्षांनंतर त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि अनाकॅडमी हा उपक्रम सुरू केला.
राजन सिंह- नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर राजन यांनी तिरुअनंतपुरममध्ये 3 वर्षे आयपीएस अधिकारी म्हणून काम केले. तथापि, 8 वर्षे सरकारी कार्यालयात सेवा केल्यानंतर, त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात सामील होण्याचा निर्णय घेतला आणि नंतर त्यांचे शैक्षणिक व्यासपीठ- ConceptOwl सुरू केले.
सय्यद सबाहत अजीम- त्यांनी २०२० मध्ये आयएएस परीक्षा उत्तीर्ण केली. काही वर्षे आयएएस अधिकारी म्हणून काम केल्यानंतर सय्यद यांनी नोकरी सोडली आणि ग्लोकल हेल्थकेअर सिस्टम्स नावाची कंपनी सुरू केली. सय्यद यांच्याकडे डॉक्टरेट पदवी आहे, ज्यामुळे त्यांना हा व्यवसाय सुरू करण्यास मदत झाली.
विवेक कुलकर्णी - 1970 च्या बॅचच्या या आयएएस अधिकाऱ्याने ब्रिकवर्क इंडिया हा उपक्रम सुरू करण्यासाठी 22 वर्षे काम केल्यानंतर सेवा सोडली. ब्रिकवर्क इंडिया ही नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग फर्म आहे. ही फर्म जागतिक कंपन्यांना व्हर्चुअलर सहाय्य प्रदान करते.
प्रवेश शर्मा- ते 1982 मध्ये आयएएस अधिकारी झाले आणि तीन दशकांहून अधिक काळ सरकारी कार्यालयात काम केल्यानंतर त्यांनी 2016 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी भाजीविक्रेते स्टार्टअप सुरू केले.