शिवानीचे वडील मजूरी करतात. तर आई माधुरी घरात मोलकरीणीचे काम करते. लहान भाऊ बारावीत शिकत आहे. एका खोलीत चार लोक राहतात. अशा परिस्थितीतही शिवानीने हार न मानता मोठे यश मिळवले आहे.
शिवानीला सीबीएसई 12वीमध्ये 94 टक्के गुण मिळाले आहेत. शिवानी एकटी खोलीत व्यवस्थित अभ्यास करू शकेल, यासाठी बोर्डाच्या परीक्षेदरम्यान, शिवानीचे आई-वडील आणि भाऊ बाहेर गच्चीवर झोपायचे.
आपल्या मुलीला टॉपर बनवण्यासाठी पालकांनी रात्रंदिवस मेहनत केली आणि आता त्यांच्या मुलीने 94 टक्के मिळवून त्यांना अभिमान वाटेल, अशी कामगिरी केली आहे.
शिवानीने सांगितले की, तिने गोमती नगर येथील स्टडी हॉलमधून अभ्यास केला. तिथे संपूर्ण फी माफ झाली, त्यामुळे तिला अभ्यास करता आला.
ती पुढे म्हणते की, आई-वडिलांच्या संघर्षानेच तिच्या यशाची गाथा लिहिली. तिच्या यशाचे रहस्य सांगताना, शिवानी म्हणाली की, ती रोज संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत अभ्यास करायची.
अभ्यासाचा जास्त ताण घेतला नाही. कोणतेही कोचिंग केले नाही. स्वअभ्यासातून तिने इतके गुण मिळवल्याचे सांगितले.
ती पुढे म्हणते की, जी मुले त्यांच्या परिस्थितीपुढे हार मानतात आणि चुकीचे पाऊल उचलतात त्यांनी तसे करू नये. जर त्यांचे पालक पूर्ण सहकार्य करत असतील तर त्यांनीही मेहनत घ्यावी, असा सल्ला तिने दिला.