मारुतीच्या व्हॅन सेगमेंटमध्ये येणारी Eeco केवळ व्यावसायिकच नाही तर वैयक्तिक वापरातही लोकांमध्ये लोकप्रिय आहे. कारची किंमत 4,63,200 रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलची किंमत 7,63,200 रुपये आहे.
Datsun Go च्या वाढत्या लोकप्रियतेनंतर कंपनीने तिचं 7 सीटर मॉडेल गो प्लस लॉन्च केले. बजेट सेगमेंटच्या 7 सीटरमध्ये ही कार खूप लोकप्रिय आहे, तिची किंमत 4,25,926 रुपयांपासून सुरू होते आणि 6,99,976 रुपयांपर्यंत जाते.
रेनॉल्ट ट्रायबरला ट्रेंडी लुक्स आणि वैशिष्ट्यांसाठी ओळखलं जातं. तसेच कारची किंमत देखील तिला खास बनवते. Renault Triber च्या बेस मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 5,91,800 रुपये आहे, तर त्याच्या टॉप मॉडेलची किंमत 8,50,800 रुपये आहे.
मारुतीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक Ertiga देखील या यादीत स्थान मिळवते. कारची किंमत 8.41 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 11.60 लाख रुपयांपर्यंत जाते.
महिंद्राची बोलेरो ही देशातील सर्वात लोकप्रिय एसयूव्ही कारही या यादीत आहे. कामगिरी आणि ताकदीसाठी प्रसिद्ध असलेली बोलेरो ही 7 सीटर एसयूव्ही देखील आहे आणि ती तुमच्या बजेटमध्ये सहज बसू शकते. या कारची सुरुवातीची किंमत 9,45,401 रुपये आहे. त्याच वेळी, त्याच्या टॉप मॉडेलची किंमत 10,43,400 रुपये आहे.
काही काळापूर्वी महिंद्राने बोलेरोचे नवे मॉडेल निओ लाँच केले. लुक आणि फीचर्समुळे ही कार लोकांना खूप आवडली आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 9,47,799 रुपयांपासून सुरू होते आणि 11,99,000 रुपयांपर्यंत जाते.
Kia ने यावर्षी लॉन्च केलेली MPV कारेंस तुमच्या बजेटमध्ये देखील येऊ शकते. कंपनी लवकरच या कारचे फेसलिफ्ट लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कारची किंमत 9,59,900 रुपयांपासून सुरू होते आणि 16,59,900 रुपयांपर्यंत जाते.