Tata Nexon ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी कॉम्पॅक्ट SUV आहे. ही कार अनेक व्हेरियंटमध्ये आणि पॉवरट्रेन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. विशेष म्हणजे नेक्सॉनच्या बेस मॉडेलमध्येही अनेक सेफ्टी फीचर्स उपलब्ध आहेत, जी सेगमेंटच्या इतर वाहनांमध्ये उपलब्ध नाहीत. Tata Nexonला 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळालं आहे.
सुरक्षेच्या बाबतीत, टाटा नेक्सॉनला ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, रेअर पार्किंग सेन्सर्स, रियर-व्ह्यू कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, (ESP), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) इत्यादी सुरक्षा फीचर्ससह उत्कृष्ट बिल्ड क्वालिटी मिळते. ISOFIX चाइल्ड-सीट अँकर सारखं फीचर्सही उपलब्ध आहे. यापैकी काही सुरक्षा वैशिष्ट्ये फक्त टॉप मॉडेलमध्ये उपलब्ध आहेत. टाटा मोटर्स
Tata Nexon पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्यायांसह येते. या कारमध्ये 1.2-लिटर 3-सिलेंडर टर्बो-पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 120PS पॉवर आणि 170Nm टॉर्क जनरेट करू शकते. तसेच कारमध्ये 1.5-लिटर चार-सिलेंडर डिझेल इंजिनही देण्यात आलं आहे. हे इंजिन 110PS पॉवर आणि 260Nm टॉर्क जनरेट करू शकते. दोन्ही इंजिन सिक्स-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा सिक्स-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येतात. टाटा मोटर्स
Nexonला 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, व्हॉईस कमांडसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कूल केलेला ग्लोव्हबॉक्स, रीअर व्हेंट्ससह ऑटो एसी, क्रूझ कंट्रोल आणि रेन सेन्सिंग वायपर्स देखील मिळतात. टॉप-एंड व्हेरियंटमध्ये व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, ऑटो-डिमिंग IRVM, 8-स्पीकर साउंड सिस्टीम इत्यादी फीचर्स देखील मिळतात. टाटा मोटर्स