Home » photogallery » auto-and-tech » STROM MOTORS R3 CAR WILL BE LAUNCHED SOON SEE EXCLUSIVE PICTURES OF THE CAR RP

बजेटमधील इलेक्ट्रिक कार लवकरच लॉन्च होणार; 4.5 लाख किंमत, 200 किमीची रेंज

Electric car : इलेक्ट्रिक कारचे नाव येताच महागड्या कारची चर्चा रंगते, पण आता तसे होणार नाही. आता तुम्हाला अल्टोच्या किमतीत इलेक्ट्रिक कारचा आनंद लुटता येणार आहे. भारतातील इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी Storm Motors आपली R3 नावाची कार लवकरच बाजारात आणणार आहे. या कारची अनेक वैशिष्ट्ये असली तरी त्याची रेंज हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. पूर्ण चार्ज केल्यावर ही कार 200 किमी अंतर कापते. कमी किंमत आणि लहान आकार असूनही या वाहनाची अंतर कापण्याची रेंज चांगली ठेवण्यात आली आहे. त्याबद्दल अधिक जाणून घेऊया.

  • |