2. बजाज सीटी 110X - बजाजने 2021 मध्ये लोकप्रिय बाइक सीटी100 चं अपडेट व्हर्जन बजाज सीटी100X नावाने लाँच केली. ही बाइक खास ऑफ-रोड अॅडिशनसह लाँच केली होती. या बाइकची किंमत फक्त 65,453 (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी आहे. या बाइकमध्ये तुम्हाला 115 सीसीचं डीटीएस-आय इंजन मिळतं. जे 8.48 बीएचपीवर 9.81 एनएम इतका पीक टॉर्क देतो. इंजनमध्ये 4-स्पीड गियरबॉक्स आहे. खराब रस्ते लक्षात घेता या बाइकचा ग्राऊंड क्लियरन्स 170 मीमी इतका आहे. त्यामुळे ऑफ रोड ड्राइव्ह करण्यासाठी खास आहे. या बाइकचं मायलेज हे 70 किमी प्रती लिटर असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
3. हीरो ग्लॅमर 125 -: हीरो मोटोकॉर्पने पुन्हा एकदा हीरो ग्लॅमर 125 लाँच केली आहे. नव्या लूकसह या बाइकमध्ये तुम्हाला 124.7 सीसी बीएस 6 इंजन मिळतं. जे 10.72 बीएचपी आणि 10.6 एनएम टार्क जनरेट करतो. या नव्या ग्लॅमरमध्ये तुम्हाला 13 लिटरची टाकी मिळते. या बाइकचं मायलेज हे 60 किमी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या बाइकची किंमत ही 76,500 ते 82,300 (एक्स-शोरूम, दिली) इतकी आहे. 6 रंगामध्ये ही गाडी उपलब्ध आहे.
4. होंडा शाइन -: होंडाची शाइन बाइक गेल्या अनेक वर्षांपासून मार्केटमध्ये आपले स्थान टिकवून आहे. स्मूथ इंजन आणि कमी मेंटनेटमध्ये ही बाइक लोकप्रिय आहे. या बाइकमध्ये तुम्हाला 124.7 सीसी इंजन मिळत जे बीएस 6 असून 10.50 बीएचपी आणि 11 एनएम टॉर्क पॉवर जनरेट करते. य बाइकचं मायलेज हे 50 ते 55 किंमी असल्याचा दावा केला जात आहे. या बाइकची किंमत ड्रम ब्रेक व्हेरिएंटमध्य 76,314 आणि डिस्क ट्रिमची किंमत 80,314 रुपये आहे.
5. टीवीएस रेडर :- टीव्हीएसने अलीकडे रेडर ही बाइक लाँच केली आहे. आकर्षक डिझाइनमुळे ही गाडी बाइक ऑफ इ इयर ठरली आहे. या बाइकमध्ये तुम्हाला 12 सीसी इंजन मिळतं. एलईडी टेललाइट, अधिक टोंड-डाउन टेल सेक्शन आणि हटके डिझाइनमुळे ही बाइक तुम्हाला 150 सीसी बाइकचा फील देते. विशेष म्हणजे, या बाइकची किंमत ही 84,573 आणि डिस्क ब्रेक एडिशनमध्ये 90,989 (एक्स-शोरूम, दिल्ली ) आहे. यत 124.8 सीसी, एयर आणि ऑयल-कूल्ड, तीन-व्हॉल्व इंजन मिळते. जे 11.2 बीएचपी आणि 11.2 एनएम इतका टॉर्क जनरेट करते. या बाइकमध्ये तुम्हाला 5-स्पीड गियरबॉक्स मिळतो. 0 ते 60 किमी वेग ही अवघ्या 5.9 सेकंदमध्ये टच करते.