पेट्रोल किंवा डिझेल गाड्यांप्रमाणे सीएनजी कारमध्ये एअर कंडिशनर किंवा हिटरचा जास्त वापर केल्यास इंधनाच्या वापरावर परिणाम होतो. त्यामुळे कारमध्ये एसी किंवा हीटर तेव्हाच चालू करा, जेव्हा त्याची खूप गरज असते, कारण एसी किंवा हीटर जास्त प्रमाणात ऊर्जा वापरतात. एसी किंवा हीटर चालू असताना, सीएनजी कारचा इंधनाचा वापर वाढतो.
सीएनजी गॅस वाफेच्या रूपात इंधन टाकीतून वाफेच्या स्वरुपात उडू शकतं. यासाठी गॅस लीडमध्ये काही गळती आहे का ते तपासा. गॅस लीड घट्ट बंद आहे की नाही. तसेच गाडी नेहमी सावलीत किंवा झाडाखाली पार्क करावी. जेणेकरून सूर्यप्रकाशाचा थेट परिणाम कारवर होणार नाही आणि सीएनजी गॅसचं बाष्पीभवन होण्याची शक्यता कमी होईल.