संजू सॅमसनचं बारकाईने निरीक्षण केलं, तर लक्षात येईल की त्याचा साधेपणा आकर्षक आणि संस्मरणीय ठरतो. क्रमांक 2चा स्वामी चंद्र असल्याने त्याचे साधेपणा, शांत वृत्ती, दयाळू, सच्चेपणा आणि लक्षवेधी देहबोली हे गुण संजू सॅमसनमध्ये असल्याचं दिसतं.
ग्राउंडवरच्या इतर प्लेअर्सच्या तुलनेत त्याच्याकडे अंतःप्रेरणा जास्त प्रमाणात आहे, हेदेखील विसरून चालणार नाही. तो धीर धरणारा, आत्मविश्वास आणि स्वाभिमानाने परिपूर्ण आहे. मन वळवण्याची अद्वितीय क्षमता असल्याने तो एक महान कॅप्टन ठरतो.
मन वळवण्याची पद्धती आणि गरज लक्षात घेऊन तो टीममधल्या सदस्यांवर वर्चस्व गाजवतो. इतरांना न दुखावता वर्चस्व गाजवण्याचा हा गुण स्टार संजू सॅमसनसारख्या 11 नोव्हेंबरला जन्मलेल्या व्यक्तींमध्येच असतो.
आता प्रश्न असा आहे, की आयपीएल सीझन 2023 संजू सॅमसनसाठी कसा असेल? या सीझनमध्ये त्याने इतर प्लेअर्सकडून बॅटिंगमध्ये सर्वोत्तम समन्वयाची तयारी करून घेतली पाहिजे.
कारण यामुळे त्याला अंतिम विजय मिळू शकेल. अन्यथा 2024 च्या गोल्डन रिझल्टची प्रतीक्षा आहे. अंकशास्त्रानुसार त्याचा जर्सी क्रमांक त्यासाठी सर्वोत्तम आहे, ही एक चांगली बाब म्हणावी लागेल. संजू क्रमांक 9 असलेली जर्सी परिधान करतो. ही जर्सी त्याच्यासाठी सर्व सीझनमध्ये आणि सर्व क्रिकेट फॉरमॅटसाठी पूर्णपणे अनुकूल आहे.
शुभ रंग - निळा, जांभळा. शुभ वार - सोमवार. शुभांक - 2 आणि 9. दान : त्याने अनाथ व्यक्तींना साखर आणि दूध दान करावं. तसंच मोबाइल कव्हर लाल रंगाचं असावं.