मेष आज स्वभाव धार्मिक होईल. वाचा शुद्ध आणि सौम्य असावी हेच या दिवसाचे सांगणे आहे. लाभ स्थानात सूर्य आहे, नवीन संधी चालून येतील. शुक्र परदेश गमनाचे योग्य मार्ग सुचवेल. प्रकृती जपा. दिवस चांगला.
वृषभ शुक्र चंद्र गुरू नवीन संधी आणेल. व्यय राहू मानसिक अशांतता देईल. कार्यरत राहून सामाजिक दायित्व निभवा. संततीची योग्य ती काळजी घ्या. खर्च आटोक्यात ठेवा. मित्र मंडळींशी संपर्क होईल. दिवस शुभ.
मिथुन आज दिवस कार्यालयीन जबाबदारी, जास्तीचे काम तसेच पितृभेट असा जाईल. गुरू सर्व चिंता दूर करेल. घरात कार्य ठरतील. सध्याचा काळ हा प्रकृतीची काळजी घेण्याचा आहे. आर्थिक व्यय होतील दिवस संथ जाईल.
कर्क चंद्र व्यय स्थानातून आर्थिकदृष्ट्या काही खर्चिक प्रवास योग आणेल. दवाखान्याची फेरी होऊ शकते. पत्नीची हौस पुरवाल. शुक्र आनंदी वातावरण ठेवेल. दिवस शुभ.
सिंह लाभ स्थानातील चंद्र घरात अचानक आनंद निर्माण करेल. मित्र मंडळी भेट देतील. आर्थिक व्यय होतील. आई-वडिलांची काळजी घ्या. जोडीदाराला कष्टदायक काळ आहे. प्रकृती जपा. दिवस मध्यम.
कन्या आज दिवस दशम चंद्र गुरू योगामुळे शुभ फळ देतील. स्त्री रोग असतील तर सावध राहण्याचा दिवस आहे. नकारात्मक विचार करून त्रास करून घेऊ नका. खर्च होईल. शैक्षणिक कार्य हातून घडेल. दिवस शुभ.
तुळ आज दिवस नवीन जबाबदारी, त्यासाठी खर्च,आणि परदेशसंबंधी वार्ता असा जाईल. घरामध्ये नवीन खरेदी होईल. वैवाहिक जीवन सुखाचे राहील. भावंडाना शुभ काळ आहे. खर्च जपून करा. दिवस मध्यम.
वृश्चिक मध्यम दिवस आहे तरी प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शीत विकार होतील. संततीकडून चांगली बातमी मिळेल. प्रवास होतील. दिवस शांततेत घालवा..
धनु दिवसाचे ग्रहमान स्वतः बद्दल संभ्रम निर्माण करेल. वैवाहिक जीवन सुखाचे. दिवस चांगला जाईल. कार्यालयीन कामकाज नेहमीपेक्षा जास्त करावे लागेल. घरात देखील जबाबदारी येईल. घरात काही काम निघेल. दिवस मध्यम.
मकर राशी स्वामी शनी कुंभ राशीत आहे. षष्ठ चंद्र गुरू योग प्रवास, धार्मिक कार्य करण्यासाठी प्रवृत्त करेल. शुक्र व्यक्तीमत्वात सुधार आणेल. कलासक्त जीवन होईल. आर्थिक लाभ देईल. दिवस शुभ.
कुंभ सध्याचे ग्रहमान अनुकूल आहे. व्ययस्थ ग्रह नुकसान आणि निराशाजनक घटना घडवतील. कार्यालयीन कामकाज वाढेल. आज चंद्र अनुकूल असून धनदायक आहे. प्रवास टाळा. जपून रहावे हे बरे. दिवस मध्यम.
मीन राशीतील गुरू आणि चंद्र योगाचे सुंदर परिणाम दिसतील. एक आनंदी दिवस आहे. वैवाहिक जीवन सुखद राहील. लाभ घडतील. घरात नवीन जबाबदारी येईल. मित्र भेट संभवते. अनुकूल दिवस. शुभम भवतू!!