#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) या आठवड्यात प्रकृतीची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. मानसिक ताणाचा तुमच्या कार्यपद्धतीवर परिणाम झाल्यास ते तुम्हाला महागात पडेल. माध्यमं आणि वैद्यकीय विज्ञान क्षेत्रातल्या व्यक्तींना नवीन संधी चालून येण्याची शक्यता आहे. या आठवड्यात बाहेर जाण्याचा विचार असेल, तर जोडप्यांनी तूर्तास तो बाजूला ठेवावा. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची नवीन संधी मिळेल. शुभ रंग : Creme शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 1 दान : गरिबांना दही दान करा.
#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) एकट्या प्रोप्रायटरपेक्षा भागीदारीमध्ये व्यवसाय करणाऱ्यांचं भाग्य या आठवड्यात चांगलं असेल. आयटी क्षेत्र, इंजिनीअरिंग, दागिने, हिरे, आयात-निर्यात, जॉ अँड केमिकल्स या क्षेत्रातल्या व्यवसायाचा विकास होऊन व्यावसायिक त्यांचा ब्रँड मजबूत करतील. मार्केटिंगशी संबंधित गुंतवणूक करणं टाळावं. चांगली जोडी जुळली असेल, तरी लग्नासाठी इच्छुक असणाऱ्यांनी सध्या थोडं थांबावं. शुभ रंग : Yellow शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : आश्रमात साखर दान करा.
#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) उत्तम वक्ते असणाऱ्यांना त्यांचं वक्तृत्व कौशल्य दाखवण्यासाठी आणि जगातल्या बिझनेसचा एक भाग बनण्यासाठी हा आठवडा खूप चांगला असणार आहे. या आठवड्यात मिळालेल्या माहितीमुळे भरपूर पैसा मिळेल व भविष्यातल्या संधींची पेरणी होईल. शिक्षक, शास्त्रज्ञ, लेखक, दिग्दर्शक, सीए, प्रशिक्षक, प्रेरणादायी वक्ते, वास्तुविषयक सल्लागार, समुपदेशक आणि खगोलशास्त्रज्ञ यांनी या आठवड्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे. योग्य जोडीदार शोधण्यासाठी ही योग्य वेळ आहे. शुभ रंग : Orange शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 दान : महिलेला केशर दान करा.
#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) हा आठवडा आर्थिक विवंचनेत व्यतीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचं लक्ष केवळ तुमच्या ध्येयावर ठेवा आणि अनावश्यक विचार टाळा. या आठवड्यात तुमच्या ध्येयापासून विचलित होण्याचे प्रसंग येऊ शकतात; मात्र त्याकडे दुर्लक्ष करा व पुढे जा. जुनी मित्रमंडळी भेटून त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या. उच्च शिक्षणासाठी किंवा डिजिटल मार्केटिंगमध्ये पैसे गुंतवावे लागू शकतात. स्त्रियांनी चांगल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी साध्या शाकाहारी अन्नाचं सेवन करावं. शुभ रंग : Grey शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 5 दान : गरिबांना चपला दान करा.
#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) एखाद्या टीम लीडरची भूमिका निभावत असलेल्या व्यक्तींना या आठवड्यात त्यांच्या मेहनतीचं फळ मिळेल. तुमची सर्वोत्तम कामगिरी या आठवड्यात तुमचं भविष्य बदलेल. परस्परांबद्दलचा विश्वास वाढवण्यासाठी आणि नातं दृढ करण्यासाठी एखाद्या रोमँटिक डेटवर जाल. खेळाडू विशेषतः फुटबॉलपटू आणि क्रिकेटपटू त्यांच्या देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करतील. निवडणुकीतले उमेदवार आणि चित्रपटातील कलाकारांना त्यांच्या नवीन प्रकल्पामुळे भरपूर लोकप्रियता मिळेल. त्यामुळे त्यांनी तो साजरा करावा. शुभ रंग : Teal शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : अनाथाश्रमांना मीठ दान करा.
#नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) या आठवड्यात तुम्हाला स्वतःला सीमित करावं लागेल अशा अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागेल. इतरांच्या वर्चस्वामुळे तुमच्या स्वातंत्र्यावर गदा आल्यासारखी तुम्हाला वाटेल; पण ते तात्पुरतं असेल. काही काळ गेल्यावर तुमच्या मनावरचा ताण हलका होईल. सकारात्मकता आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी घरगुती जबाबदाऱ्या, अभ्यास, नवीन कोर्सेस, व्यायाम, कौटुंबिक स्नेहसंमेलनं, छंद, बागकाम, पोहणं किंवा आध्यात्मिक मेळाव्यांमध्ये वेळ व्यतीत करा. मालमत्ता आणि सोन्यात गुंतवणूक सुरळीतपणे करता येईल. मुलांना गरज असल्याने पालक मुलांसोबत जास्त वेळ घालवतील. शुभ रंग : Pink शुभ दिवस : मंगळवार आणि बुधवार शुभ अंक : 5 दान : आश्रमात गृहोपयोगी वस्तू दान करा.
#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) सादरीकरण, गटचर्चा, मुलाखती, ऑडिशन आणि वादविवाद यात भाग घेऊन जिंकण्याची ही वेळ आहे. वकील, बिल्डर्स, सॉफ्टवेअर इंजिनीअर्स, फायनान्सर्स, खेळाडू आणि राजकीय व्यक्ती त्यांच्या सहकाऱ्यांवर, तसंच जनसामान्यांवर जादुई प्रभाव टाकतील. भाग्य उजळण्यासाठी तुमच्या बॅगमध्ये नेहमी बडीशेप ठेवा. चांगल्या कामामुळे व व्यवस्थापकीय कौशल्यांमुळे महिलांना कामाच्या ठिकाणी उपयोग होईल. तुमच्या जोडीदाराच्या मागण्यांकडे लक्ष द्या. कारण त्यामुळे परस्परांमधला विश्वास व नातं दृढ होईल. शुभ रंग : Yellow शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : घरगुती मदतनीसांना धातूचं भांडं दान करा.
#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्या व्यक्तींना हा आठवडा थोडा खडतर असेल. डॉक्टर्स, फार्मासिस्ट, व्यापारी, कमिशन एजंट, जमिनीचा व्यवहार करणारे, आणि माध्यमात काम करणाऱ्या व्यक्तींनी नवीन व्यवयास कल्पना व त्यात गुंतवणूक आठवडाभर टाळावी. अभिनेते आणि एकटे असणाऱ्यांना नवीन प्रकल्प मिळवण्यासाठी खटपट करावी लागेल. शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भगवान शंकरांचे पूजाविधी करा. या आठवड्यात तुम्ही मूल्यांकनाची पर्वा न करता कामात गढून जाल. निराश होऊ नका. ही वेळही लवकरच निघून जाईल. शुभ रंग : Brown शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : गरीब व्यक्ती आणि प्राण्यांना खाऱ्या पदार्थांचं दान करा.
#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) मालमत्ता, प्रसिद्धी, संगीत, सौंदर्य आणि शिक्षण या क्षेत्रात जास्तीत जास्त नफा कमावण्यासाठी आठवड्याच्या सुरुवातीपासूनच नियोजन करा. 'वर्क फ्रॉम होम'पेक्षा 'वर्क फ्रॉम ऑफिस'ला प्राधान्य द्या. पोहणं किंवा इतर कुठलाही व्यायाम तुम्हाला तंदुरुस्त राखण्यासाठी मदत करील. तसंच इतरांवर तुमची चांगली छाप पडेल. इंटरव्ह्यू किंवा ऑडिशनला सामोरं जाण्याआधी कपाळावर कुंकू लावा. यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात आकर्षकता येईल. या आठवड्यात भरपूर संधी आणि यशही मिळण्याची शक्यता असल्यानं तुमचा आत्मविश्वास चांगला राहील. शुभ रंग : Red and Violet शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : लहान मुलांना सफरचंदं दान करा.