कोल्हापूरमध्ये झालेल्या कृषी प्रदर्शनात वेगवेगळ्या भागातील प्राण्यांनी सर्वांच लक्ष वेधून घेतलं.
2/ 8
या प्रदर्शनात 12 कोटींच्या रेड्याची सर्वात जास्त हवा होती. कृषी प्रदर्शनात आलेला प्रत्येक जण हा रेडा पाहून थक्क होत होता.
3/ 8
मुंबईसारख्या महानगरामध्ये 12 कोटींंमध्ये एक घर आरामात येऊ शकते. या महागड्या रेड्याचं नाव बादशाह असून तो हरियाणातला आहे.
4/ 8
हरियाणा येथील प्रदीपसिंग चौधरी यांच्या मालकीचा हा रेडा आहे. प्रदीप हे भिवाणी जिल्ह्यातील दुर्जनपुर गावचे रहिवासी आहेत.
5/ 8
बादशाह रेडा हा तीन वेळा नॅशनल चॅम्पियन मिळविणारा जगातील सर्वात मोठा रेडा आहे. त्याची उंची 6 फूट आहे. हा चार वर्षांचा रेडा असून त्याचे वजन 1100 किलो आहे.
6/ 8
या रेड्याची 12 कोटी इतकी किंमत त्याच्या वीर्यामुळे ठरवली जाते.सरकारी नियमानुसार दहा वर्षात या रेड्याकडून 12 कोटी रुपयांपर्यंतची वीर्य विक्री होऊ शकते. यावरूनच याची किंमत ठरल्याचे मालक प्रदीप यांनी स्पष्ट केले.
7/ 8
या रेड्याचा दिनक्रम पहाटे चार वाजता सुरू होतो. पहाटे त्याला खाद्य दिले जाते. त्यानंतर त्याला अंघोळ घातली जाते. त्याचबरोबर दर महिन्याला त्याच्या अंगावरचे केस काढले जातात.
8/ 8
प्रदिपसिंग चौधरी, संदीप, अनिल, कैलाश, डॉ. श्रीक्रिष्णन, दिपेंदर, लोकेश, राज, कप्तान सिंग असे सगळे जण मिळून या रेड्याचं पालनपोषण करतात.