
जगातील प्रत्येकाचे डोळे कोरोना लशीकडे लागून आहेत. जगभरात शेकडो कोरोना लशींवर काम सुरू आहे, यापैकी काही लशी मानवी चाचणीच्या टप्प्यात आहे, त्यापैकी मोजक्याच लशींचं क्लिनिकल ट्रायलचा शेवटचा टप्पा सुरू आहे.

या लशी तयार करणाऱ्या कंपन्यांनी आपली लस बाजारात कधी उपलब्ध होणार यााबाबत दावे केले आहेत. मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत मोठी माहिती दिली आहे.

काही लशी आता क्लिनिकल ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात आहेत आणि या लशी सुरक्षित आणि परिणाकारक असतील आम्हाला आशा आहे, असं WHO म्हटलं.

2021 वर्षाच्या अखेरपर्यंत आपल्याला कोरोनाविरोधात प्रभावी अशी लस उपलब्ध होईल. असं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं.

सर्वात आधी जगभरातील आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जाईल. त्यानंतर 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना आणि ज्यांना इतर आजार आहेत अशा लोकांना सुरुवातीला ही लस दिली जाणार असल्याची माहिती WHO ने दिली.

2021 अखेरपर्यंत कोवॅक्सच्या माध्यमातून कमीत कमी 2 दशलक्ष डोस पुरवण्याचं ध्येय आहे. त्यानंतर देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता कोरोना लशीचं उत्पादन केलं जाईल, असं WHO जाहीर केलं आहे.




