जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / प्रेग्नन्सीमध्ये लसीकरण बाळाचं आजारांपासून करतं संरक्षण; कोणत्या लशी आहेत महत्त्वाच्या?

प्रेग्नन्सीमध्ये लसीकरण बाळाचं आजारांपासून करतं संरक्षण; कोणत्या लशी आहेत महत्त्वाच्या?

गरोदरपणात कोणत्या लशी घ्याव्यात आणि कोणत्या नाही याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं आहे.

01
News18 Lokmat

कुठल्याही संसर्गजन्य आजाराशी लढण्यासाठी चांगली रोगप्रतिकारक शक्ती असणे आवश्यक आहे. मात्र असे अनेक संसर्गजन्य आजार आहेत ज्यांच्याशी लढण्याची पुरेशी शक्ती आपल्या शरीरात नसते. अशावेळी विशिष्ट लसी या आजारांशी लढण्यासाठी तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात.

जाहिरात
02
News18 Lokmat

गर्भवती मातांना आणि गर्भातील बाळांना विविध आजारांचा संसर्ग होण्याचा धोका असतो. अशावेळी लसीकरण फायदेशीर ठरतं.

जाहिरात
03
News18 Lokmat

टिटॅनस टॉक्साईड ही गर्भवती महिलांना 24 आठवड्यांनंतर नियमित देण्याची लस आहे. चार आठवड्यातून दोनदा ही लस महिलेला द्यावी लागते. गेल्या अनेक वर्षांपासून ही लस महिलांना दिली जाते. यामुळे गर्भातील बाळाला कुठल्याही प्रकारचा संसर्ग होत नाही.

जाहिरात
04
News18 Lokmat

हेपेटायटीस लस - गर्भवती महिलेला हेपेटायटीसचा संसर्ग झाल्यास होणाऱ्या बाळालाही हा आजार होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे हे टाळण्यासाठी हेपेटायटीस लस टोचली जाते.

जाहिरात
05
News18 Lokmat

टीडॅप लस - धनुर्वात (टिटॅनस), डायफ्थेरिया (Diphtheria), पर्टुसिस(Pertussis) साठी दिली जाणारी ही लस. ही लस नवीन असून या लशीसंदर्भात अद्याप जागरूकता नाही. धनुर्वात झाल्यास महिलेचा जीव धोक्यात येतो. डायफ्थेरियाहा श्वसनाचा संसर्ग असून तो श्वसनाच्या समस्या, पॅरेलिसीस आणि कोमा यांना कारण ठरतो. पर्टुसिस हा एक संसर्गजन्य जीवाणूंचा आजार असून तो नवजात बालकांमध्ये मृत्यूचं कारण ठरू शकतो. त्यामुळे ही लस गरोदरपणाच्या 27-36 व्या आठवड्यात घ्यावी लागते.

जाहिरात
06
News18 Lokmat

टायफॉईड- स्त्रियांना प्रसूतीनंतर टायफॉईड होऊ नये म्हणून लस दिली जाते. ही लस घेतल्यानंतर गर्भवती स्त्रियांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये तसंच बाहेरून आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावेत जेणेकरून बाळाला संसर्ग होणार नाही.

जाहिरात
07
News18 Lokmat

गर्भवती महिलांना एचपीव्ही, गोवर,रुबेला, गालगुंड, कांजण्या या लसी देत नाहीत. या आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी गर्भवती महिलांनी गर्भधारणा करण्यापूर्वी किमान दीड महिना आधी या लसी घ्याव्यात.

जाहिरात
08
News18 Lokmat

डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच लसींची आखणी करा. हे तुम्हाला आणि तुमच्या बाळाला रोगमुक्त आयुष्य जगू देईल, असा सल्ला नवी मुंबईतील खारघरच्या मदरहूड हॉस्पिटलमधील प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनु विज यांनी दिला आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    प्रेग्नन्सीमध्ये लसीकरण बाळाचं आजारांपासून करतं संरक्षण; कोणत्या लशी आहेत महत्त्वाच्या?

    कुठल्याही संसर्गजन्य आजाराशी लढण्यासाठी चांगली रोगप्रतिकारक शक्ती असणे आवश्यक आहे. मात्र असे अनेक संसर्गजन्य आजार आहेत ज्यांच्याशी लढण्याची पुरेशी शक्ती आपल्या शरीरात नसते. अशावेळी विशिष्ट लसी या आजारांशी लढण्यासाठी तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    प्रेग्नन्सीमध्ये लसीकरण बाळाचं आजारांपासून करतं संरक्षण; कोणत्या लशी आहेत महत्त्वाच्या?

    गर्भवती मातांना आणि गर्भातील बाळांना विविध आजारांचा संसर्ग होण्याचा धोका असतो. अशावेळी लसीकरण फायदेशीर ठरतं.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    प्रेग्नन्सीमध्ये लसीकरण बाळाचं आजारांपासून करतं संरक्षण; कोणत्या लशी आहेत महत्त्वाच्या?

    टिटॅनस टॉक्साईड ही गर्भवती महिलांना 24 आठवड्यांनंतर नियमित देण्याची लस आहे. चार आठवड्यातून दोनदा ही लस महिलेला द्यावी लागते. गेल्या अनेक वर्षांपासून ही लस महिलांना दिली जाते. यामुळे गर्भातील बाळाला कुठल्याही प्रकारचा संसर्ग होत नाही.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    प्रेग्नन्सीमध्ये लसीकरण बाळाचं आजारांपासून करतं संरक्षण; कोणत्या लशी आहेत महत्त्वाच्या?

    हेपेटायटीस लस - गर्भवती महिलेला हेपेटायटीसचा संसर्ग झाल्यास होणाऱ्या बाळालाही हा आजार होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे हे टाळण्यासाठी हेपेटायटीस लस टोचली जाते.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    प्रेग्नन्सीमध्ये लसीकरण बाळाचं आजारांपासून करतं संरक्षण; कोणत्या लशी आहेत महत्त्वाच्या?

    टीडॅप लस - धनुर्वात (टिटॅनस), डायफ्थेरिया (Diphtheria), पर्टुसिस(Pertussis) साठी दिली जाणारी ही लस. ही लस नवीन असून या लशीसंदर्भात अद्याप जागरूकता नाही. धनुर्वात झाल्यास महिलेचा जीव धोक्यात येतो. डायफ्थेरियाहा श्वसनाचा संसर्ग असून तो श्वसनाच्या समस्या, पॅरेलिसीस आणि कोमा यांना कारण ठरतो. पर्टुसिस हा एक संसर्गजन्य जीवाणूंचा आजार असून तो नवजात बालकांमध्ये मृत्यूचं कारण ठरू शकतो. त्यामुळे ही लस गरोदरपणाच्या 27-36 व्या आठवड्यात घ्यावी लागते.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    प्रेग्नन्सीमध्ये लसीकरण बाळाचं आजारांपासून करतं संरक्षण; कोणत्या लशी आहेत महत्त्वाच्या?

    टायफॉईड- स्त्रियांना प्रसूतीनंतर टायफॉईड होऊ नये म्हणून लस दिली जाते. ही लस घेतल्यानंतर गर्भवती स्त्रियांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये तसंच बाहेरून आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावेत जेणेकरून बाळाला संसर्ग होणार नाही.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    प्रेग्नन्सीमध्ये लसीकरण बाळाचं आजारांपासून करतं संरक्षण; कोणत्या लशी आहेत महत्त्वाच्या?

    गर्भवती महिलांना एचपीव्ही, गोवर,रुबेला, गालगुंड, कांजण्या या लसी देत नाहीत. या आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी गर्भवती महिलांनी गर्भधारणा करण्यापूर्वी किमान दीड महिना आधी या लसी घ्याव्यात.

    MORE
    GALLERIES

  • 08 08