14 जून : 34 वर्षीय अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह मुंबईतील वांद्र्यातील घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. मुंबई पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचं कारण शोधण्यासाठी सीआरपीसी अंतर्गत तपास सुरू केला.
25 जुलै : सुशांतचे वडील केके सिंह यांनी आपल्या मुलाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करत रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाविरोधात बिहार पोलिसात गुन्हा दाखल केला.
29 जुलै : पाटणा पोलिसांनी मुंबई पोलिसांना प्रकरण हस्तांतरित करावं या मागणीसह रिया चक्रवर्ती सर्वोच्च न्यायालयात गेली.
31 जुलै : सुशांतच्या कुटुंबाने रियाने सुशांतला लुटल्याचा आरोप केल्याने ईडीने या प्रकरणात गुन्हा दाखल केला.
4 ऑगस्ट : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली. मुंबई पोलीस आयुक्तांनी या प्रकरणा एकूण 54 लोकांचा जबाब नोंदवल्याचं सांगितलं.
7 ऑगस्ट : रिया चक्रवर्तीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर केंद्र सरकारदेखील एक पक्ष म्हणून न्यायालयात गेलं.
8 ऑगस्ट : सुशांतचे वडील केके सिंह यांची रियाच्या याचिकेला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली.
11 ऑगस्ट : बिहार पोलिसांनी आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर काम केलं असं महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने रियाच्या याचिकेवर आपला निर्णय राखून ठेवला.