जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / 99 टक्के गुण मिळवूनही घरची परिस्थिती आडवी आली...डॉक्टर करण्यासाठी अमोल कोल्हेंनी स्वीकारलं मुलीचं शैक्षणिक पालकत्व

99 टक्के गुण मिळवूनही घरची परिस्थिती आडवी आली...डॉक्टर करण्यासाठी अमोल कोल्हेंनी स्वीकारलं मुलीचं शैक्षणिक पालकत्व

डॉ. अमोल कोल्हे यांच्या ‘जगदंब प्रतिष्ठान’च्या वतीने तिला अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईल भेट देण्यात आला.

01
News18 Lokmat

दहावीच्या परीक्षेत 99.60 टक्के गुण मिळवून डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बोतार्डेच्या (आमलेवाडी) ऋतुजा प्रकाश आमले हिचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शैक्षणिक पालकत्व स्वीकारलं आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

अमोल कोल्हे यांनी या विद्यार्थिनीला डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले. तसंच ऑनलाईन शिक्षण घेता यावे यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या 'जगदंब प्रतिष्ठान'च्या वतीने तिला अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईल भेट देण्यात आला.

जाहिरात
03
News18 Lokmat

जुन्नर तालुक्यातील आदिवासी 'पेसा' क्षेत्रातील आमलेवाडी बोतार्डे येथील ऋतुजाने दहावीच्या परीक्षेची तयारी करताना घराच्या भिंतीवर 99.99 टक्के गुण मिळवून डॉक्टर होण्याची इच्छा प्रकट केली होती. त्यानुसार 99.60 टक्के गुण मिळवून पहिलं स्वप्नं पूर्ण केले.

जाहिरात
04
News18 Lokmat

अतिशय गरीब कुटुंबातील ऋतुजाच्या पंखास बळ देण्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच त्याची तातडीने दखल घेऊन अमोल कोल्हे यांनी तातडीने आपल्या 'जगदंब प्रतिष्ठान'चे सदस्य ऋतुजाच्या घरी पाठवले. या कार्यकर्त्यांच्या हस्ते ऋतुजाला ऑनलाईन अभ्यासासाठी आवश्यक असणारा अॅण्ड्रॉईड मोबाईल भेट देण्यात आला. तसेच तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारुन सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

जाहिरात
05
News18 Lokmat

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, ग्रामीण भागातील विशेषतः बोतार्डेसारख्या आदिवासी क्षेत्रातील हलाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबातील एक मुलगी कष्टाने शैक्षणिक यश मिळवते, डॉक्टर होऊन समाजाची सेवा करण्याचा निश्चय करते हीच मुळात कौतुकास्पद बाब आहे. अशा गुणवान व आपल्या समाजासाठी काहीतरी करण्याची मनिषा बाळगणाऱ्या ऋतुजाचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारुन तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करण्याचं भाग्य मला लाभलं ही माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे, अशी भावना डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    99 टक्के गुण मिळवूनही घरची परिस्थिती आडवी आली...डॉक्टर करण्यासाठी अमोल कोल्हेंनी स्वीकारलं मुलीचं शैक्षणिक पालकत्व

    दहावीच्या परीक्षेत 99.60 टक्के गुण मिळवून डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बोतार्डेच्या (आमलेवाडी) ऋतुजा प्रकाश आमले हिचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शैक्षणिक पालकत्व स्वीकारलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    99 टक्के गुण मिळवूनही घरची परिस्थिती आडवी आली...डॉक्टर करण्यासाठी अमोल कोल्हेंनी स्वीकारलं मुलीचं शैक्षणिक पालकत्व

    अमोल कोल्हे यांनी या विद्यार्थिनीला डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले. तसंच ऑनलाईन शिक्षण घेता यावे यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या 'जगदंब प्रतिष्ठान'च्या वतीने तिला अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईल भेट देण्यात आला.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    99 टक्के गुण मिळवूनही घरची परिस्थिती आडवी आली...डॉक्टर करण्यासाठी अमोल कोल्हेंनी स्वीकारलं मुलीचं शैक्षणिक पालकत्व

    जुन्नर तालुक्यातील आदिवासी 'पेसा' क्षेत्रातील आमलेवाडी बोतार्डे येथील ऋतुजाने दहावीच्या परीक्षेची तयारी करताना घराच्या भिंतीवर 99.99 टक्के गुण मिळवून डॉक्टर होण्याची इच्छा प्रकट केली होती. त्यानुसार 99.60 टक्के गुण मिळवून पहिलं स्वप्नं पूर्ण केले.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    99 टक्के गुण मिळवूनही घरची परिस्थिती आडवी आली...डॉक्टर करण्यासाठी अमोल कोल्हेंनी स्वीकारलं मुलीचं शैक्षणिक पालकत्व

    अतिशय गरीब कुटुंबातील ऋतुजाच्या पंखास बळ देण्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच त्याची तातडीने दखल घेऊन अमोल कोल्हे यांनी तातडीने आपल्या 'जगदंब प्रतिष्ठान'चे सदस्य ऋतुजाच्या घरी पाठवले. या कार्यकर्त्यांच्या हस्ते ऋतुजाला ऑनलाईन अभ्यासासाठी आवश्यक असणारा अॅण्ड्रॉईड मोबाईल भेट देण्यात आला. तसेच तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारुन सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

    MORE
    GALLERIES

  • 05 05