भारताचा क्रिकेटपटू शिखर धवनची पत्नी आयशा मुखर्जी स्वत: एक किक बॉक्सर आहे आणि आपल्या फिटनेससाठी ती याचीच मदत घेते.
27 ऑगस्ट 1975 साली भारतात जन्मलेल्या आयशाकडे दुहेरी नागरिकत्व आहे. तिचे वडील बंगाली तर आई ब्रिटीश होती. बंगालमध्ये एकत्र काम करताना त्यांचं प्रेम जुळलं आणि त्यांनी लग्न केलं. आयशाच्या जन्मानंतर ते ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाले.
आयशा प्रोफेशनल किक बॉक्सर आहे आणि त्यामुळे तिला फिटनेसचं महत्त्व खूप माहिती आहे. आयशामुळे शिखर धवनलाही आपलाय फिटनेस राखण्यात मदत मिळते. धवन आयशापेक्षा 10 वर्षे लहान आहे.
आयशाने आधी ऑस्ट्रेलियन बिझनसमनशी लग्न केलं होतं. त्या दोघांच्याही दोन मुली आहेत. त्याच्याशी नातं तुटल्यानंतर आयशा फेसबुकच्या माध्यमातून शिखर धवनच्या संपर्कात आली. दोघंही एकमेकांवर प्रेम करू लागले आणि त्यांनी लग्न केलं. त्या दोघांना एक मुलगाही आहे, ज्याचं नाव जोरावर. धवनने आयशाच्या दोन मुलींनाही आपलं नाव दिलं आहे.
आयशा नेहमी स्पोर्ट्स लूकमध्ये दिसते. लहानपणापासूनच तिला खेळाची आवड आहे. एका मुलाखतीत तिनं खुलासा केला होता की लहानपणी ती शारीरिक शोषणाचा शिकार झाली होती. तिच्यासाठी ती भीतीदायक अशी आठवण आहे. मात्र इतर मुलींप्रमाणे ती विसरण्याऐवजी आयशाने स्वत:ला मजबूत बनवण्याचं ठरवलं आणि खेळाच्या मैदानात उतरली. आयशा क्रिकेट फुटबॉल खेळली. मात्र किक बॉक्सिंगमध्ये अनेक किताब जिंकल्यानंतर तिनं यालाच आपलं प्रोफेशन म्हणून निवडलं.