या देशात जगाच्या लोकसंख्येच्या केवळ 13 टक्के लोक राहतात. तर बाकी 2.6 अरब लस भारत, बांग्लादेश आणि चीनसारख्या देशांनी बुक केलं आहे. तर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी सांगितले की पुढील महिन्यात अमेरिका कोरोना लशीचं रोल आऊट करणं सुरू करेल.
सध्या त्यांच्या प्रशासनातील उपस्थित एका प्रमुख आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, 2021 च्या मध्यापर्यंत कोरोनाची लस येऊ शकते. ब्रिटेन (Britain) मधील ऑक्सफॅमच्या एका रिपोर्टनुसार काही श्रीमंत देशांनी कोरोना व्हायरसची संभावित लशीचा खुराक आधीपासूनच बुक करुन ठेवला आहे. (सौ. न्यूज18 इंग्लिश)
news18उल्लेखनीय आहे की जगातील अनेक देशात अद्यापही कोरोनाचा कहर सुरू आहे. जगात या व्हायरसमुळे संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 30.038,411 झाली आहे. जगभरात आतापर्यंत कोरोना महासाथीत 2.18 कोटींहून अधिक रुग्णांची तब्येत सुधारली आहे. (सौ. न्यूज18 इंग्लिश)
आता जगभरात एकूण संसर्गांची संख्या वाढून 3 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या आता 2 कोटी 17 लाखांहून जास्त झाली आहे. तर कोरोना महासाथीत मृत्यू होणाऱ्यांची संख्या 9 लाख 44 हजारांहून अधिक झाली आहे.