बोल्ड फोटो आणि व्हिडीओमुळे कायम चर्चेत असणारी पूनम पांडे (Poonam Pandey) सध्या पतीवरच केलेल्या विनयभंगाच्या आरोपावरून सध्या बातम्यांमध्ये आहे. बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेशी 2 आठवड्यांपूर्वी पूनमने लग्न केले. त्यानंतर दोघे हनीमूनला गेले, त्याचवेळी पूनमने पतीवर विनयभंग आणि मारहाण केल्याचे आरोप केले.
पूनमने तिच्या पतीवर अत्याचार व गैरवर्तन केल्याचा आरोप केला आणि सॅम बॉम्बेला अटक करण्यात आली. त्याचबरोबर पूनम पांडेने या संपूर्ण प्रकरणात आता उघडपणे भाष्य केले असून पतीबाबत तिने काही धक्कादायक खुलासा केला आहे.
पूनम पांडेने याआधी असे सांगितले होते की, यापूर्वी सॅमने तिच्यावर इतके अत्याचार केले की तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. त्याचवेळी पूनम पांडे यांनी स्पॉटबॉयशी बोलताना सांगितले की, "माझ्या आयुष्यात काय घडत आहे हे कोणालाही माहिती नाही. गेल्या दीड वर्षापासून मी काय त्रास घेत आहे हे कोणालाही माहिती नाही. सर्व माझ्याबद्दल वाईट गोष्टी लिहितात. मला वाटले की लग्नानंतर सर्व काही ठीक होईल पण तसे झाले नाही. होय, त्याने माझ्यावर हात उगारला आणि मला मारहाण केली".
पूनमने सांगितले की, मी पोलिसांकडे गेले नाही. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो तेथील कर्मचार्यांनी खोलीतील आवाज ऐकून पोलिसांना बोलावले. पोलीस आले तेव्हा माझा चेहरा सुजला होता, माझ्या शरीरावर खूण होते. सतत माझ्या बाबतीत जे घडत होतं, त्याचा मला राग येत होता. यामुळे मी कायदेशीर कारवाई केली.
संबंध संपवण्याच्या प्रश्नावर पूनम पांडे म्हणाली- या माणसाने माझ्यासोबतचे सर्व फोटो डिलीट केली आहेत, मी ते केले नाहीत. अजूनही सर्वकाही ठीक होईल असा विचार करून. तो माझे व्हिडिओ विकून पैसे कमवत आहे.
दरम्यान, पती सॅम बॉम्बेविरूद्ध केलेली तक्रार पूनमने मागे घेतली आहे. पूनमने सांगितले की, "प्रत्येक वेळी तो मला मारतो आणि नंतर रडतो, माफी मागतो. त्याने वचन दिले की या वेळी आपण हे करणार नाही, यामुळे मला ब्रेन हेमोरेज देखील झाला".