मुजीब शेख, नांदेड,27 जुलै : मराठा आंदोलनामुळे राज्यभरात भडका उडाला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाता बाहेर जाऊ नये म्हणून महाराष्ट्र पोलीस चोवीस तास डोळ्यात तेल घालून पहारा देत आहे. पण तरीही कुठे पोलिसांवर दगडफेक होते तर कुठे बुट मारला जात आहेत. पण राज्याचं रक्षण करणाऱ्या या महाराष्ट्र पोलिसाच्या वर्दीतील आईही लपून राहू शकली नाही…आपल्या लेकरासाठी अशाही परिस्थितीत या माता आपल्या लेकराला सोबत घेऊन कर्तव्य बजावत आहे.
आज नांदेड जिल्यातील आमदुरा येथे हिंसक आंदोलन झाले. गेल्या 24 तारखेपासून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरूच आहे. सतर्कता म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांना रात्र अन् दिवस बंदोबस्त करावा लागत आहे.
त्यात महिला पोलिसांची फारच कुचंबणा होत आहे. नको त्या ठिकाणी आंदोलनं…मग महिला पोलिसांनी शौच आणि लघवीसाठी कुठं बसावं. ज्यांना लहान मुलं-बाळ आहेत त्यांना कुठे सोडून बंदोबस्तावर जावं ? हा महिला पोलिसांचा प्रश्न आहे.
काही जणी आपल्या तान्या बाळाला घेऊन हिंसक आंदोलनाच्या बंदोबस्तासाठी येत आहेत. एकीकडे माया अन् दुसरीकडे कर्तव्य अशा दुहेरी भूमिका या महिला पोलीस निभावत आहेत.
शुक्रवारी आमदुरा येथे हिंसक आंदोलन झालं. संतप्त जमावाने दगडफेक केली, वाहनांची तोडफोड केली पोलिसांनी जमावाला हुसकावून लावलण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. अश्रू धुराच्या नळकाळ्या फोडल्या, प्लस्टिकच्या गोळ्या फायर केल्या. यात पोलीसही जखमी झाले आणि आंदोलकही जखमी झाले.
पोलिसांनी जमावाला हुसकावून लावलण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. अश्रू धुराच्या नळकाळ्या फोडल्या, प्लस्टिकच्या गोळ्या फायर केल्या. यात पोलीसही जखमी झाले आणि आंदोलकही जखमी झाले.
अश्रू धुराच्या नळकाळ्या फोडल्या, प्लस्टिकच्या गोळ्या फायर केल्या. यात पोलीसही जखमी झाले आणि आंदोलकही जखमी झाले.
खाकी वर्दीतली माय आपल्या काळज्याच्या तुकड्याला घेऊन बंदोबस्त करत होती हे दृश्य पाहून….माँ तुझे सलाम…बस्स एवढंच आपण म्हणून शकतो!