-
09 एप्रिल : सध्या आयपीएलचे वारे वाहत आहेत. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक टीमचा आणि प्रत्येक कर्णधाराचा एक भन्नाट इतिहास आहे. जाणून घेऊयात त्याबद्दलच... मुंबई इंडियन्सचं कर्णधार पद हे रोहित शर्माच्या हाती आहे. तो मुंबईचा एक सर्वोत्तम फलंदाजदेखील आहे. त्याने आतापर्यंत 3037 धावा केल्या आहेत. मुंबईच्या विजयाची सरासरी 58.28 टक्के आहे.
-
चेन्नई सुपरकिंग्जची जबाबदारी महेंद्र सिंग धोनीकडे आहे. चैन्नईच्या विजयाची सरासरी 60.68 टक्के आहे. सुरेश रैना हा चैन्नईकडून सगळ्यात जास्त धावा काढणारा खेळाडू ठरला आहे.
-
कोलकाता नाईट राईडर्सची धूरा यंदा दिनेश कार्तिककडे आहे.
-
सनराईज हैद्राबादच्या कर्णधार पदी केन विलियमसन आहे. या टीमचा सर्वात उत्तम फलंदाज डेविड वॉर्नर आहे. त्याने आतापर्यंत 3035 इतक्या धावा काढल्या आहेत.
-
दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कर्णधार पदी गौतम गंभीर आहे. या टीमची विजयाची सरासरी 43.10 टक्के आहे.
-
आयपीएल 11मध्ये राजस्थान रॉयल्सच्या कर्णधार पद अजिंक्य राहणे याने बजावलं आहे तर त्याचा मेंटॉर शेन वॉर्न होता.
-
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरची धूरा विराट कोहलीच्या हातात आहे. या संघाचा सर्वात मोठा विजय 144 धावांचा आहे. तर या संघाच्या विजयाची सरासरी 48.66 टक्के इतकी आहे.
-
किंग्य XI पंजाबविषयी बोलायचं झालं तर या टीमची धूरा स्पिनर आर आश्विनच्या हाती आहे. या टीमधून आणखी दमदार खेळणार खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाचा खेळाडू शॉन मार्श आहे.