जगभरात 160 पेक्षा अधिक कोरोना लशींवर काम सुरू आहे. जवळपास 30 लशी क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यात आहे. म्हणजे या लशींची मानवी चाचणी सुरू आहे.
देशात सध्या तीन कोरोना लशींचं क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. यामध्ये भारत बायोटेक, जायडस कॅडिला आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिट्या एस्ट्राजेनेका लशीचा समावेश आहे.
भारत बायोटेक आणि जायडस कॅडिलाच्या लशीचं पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणी सुरू आहे. तर ऑक्सफर्डच्या लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये जवळपास एक हजार लोकांना लस दिली जाते. तर तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये 2500-3000 लोकांना सहभागी केलं जातं.
क्लिनिक ट्रायलमध्ये लोकांना सहभागी करून घेण्यासाठी सामान्यपणे टीव्ही आणि वृत्तपत्रांमध्ये जाहिरात दिली जाते. हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना दिल्ली एम्समधील डॉ. संजय राय यांनी सांगितलं, आम्ही 100 वॉलेंटिअर्ससाठी जाहिरात दिली होती. त्यानंतर आम्हाला भरपूर व्हॉट्सअॅप मेसेज आणि मेल आले. प्रत्येक जण कोरोना लशीच्या ट्रायलमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक होता.
18 ते 55 वयोगटातील व्यक्तींना ट्रायलमध्ये सहभागी केलं जातं. कोरोना लशीच्या ट्रायलमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही निरोगी आणि स्वस्थ असणं खूप गरजेचं आहे. यासाठी काही टेस्ट केल्या जातात.
ब्लड शुगर, लिव्हर, किडनी या टेस्टशिवाय हेपेटायटिस बी आणि हेपेटायटिस सी, एचआयव्हीची टेस्टदेखील केल्या जातात. उच्च रक्तदाब, मधुमेह असलेल्या रुग्ण या ट्रायलमध्ये सहभागी होऊ शकत नाही.
ट्रायलमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांची कोरोना टेस्ट केली जाते. अँटिबॉडी आणि आरटी-पीसीआर दोन्ही टेस्ट होतात. टेस्ट नेगेटिव्ह आली तर दुसरी टेस्ट केली जाते.
लस दिल्यानंतर दर आठवड्याने किंवा दहा ते पंधरा दिवसांनी त्या व्यक्तीला तपासणीसाठी बोलावलं जातं. त्या व्यक्तीला काही त्रास तर होत नाही ना हे पाहिलं जातं. यावेळी त्या व्यक्तीच्या सातत्याने टेस्ट केल्या जातात.
क्लिनिक ट्रायलसाठी लोकांना पैसे दिले जात नाहीत. मात्र त्यांना काही त्रास झाला किंवा समस्या उद्भवली तर त्यावर उपचार करण्यासाठी खर्च दिला जातो.