इंग्लंडमधील कोरोना रुग्णांच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टचा अभ्यास करण्यात आला. इंपिरिअल कॉलेज लंडन आणि इंपिरिअल कॉलेज हेल्थकर एनएनचएस ट्रस्टने हा अभ्यास केला.
द लँसेट माइक्रोबमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार कोरोनाव्हायरासमुळे ज्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या फुफ्फुस आणि किडनीला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचली आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या दहा पैकी नऊ रुग्णांना हृदय, किडनी आणि फुफ्फुसामध्ये थ्रोम्बोसिस म्हणजे रक्ताच्या गुठळ्या सापडल्यात.
संशोधक डॉ. माइकल ऑस्बर्न म्हणाले, कोरोनाव्हायरस फुफ्फुसांना पूर्णपणे नष्ट करतो ज्यामुळे रुग्णाचा मृत्यू होता. कोरोना रुग्णांबाबत ही धक्कादायक अशी बाब आहे.
इंपिरिअल कॉलेज एनएचएस ट्रस्टच्या रुग्णालयात 22 ते 97 वयोगटातील मृत कोरोना रुग्णांच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये कोरोना रुग्णांच्या किडनीला कोरोनाने खूप मोठी हानी पोहोचवली होती आणि आतड्यांना सूज आली होती.