13 सप्टेंबर : बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीने आता दुधासह पाच नवीन उत्पादन लाँच केली आहे. आता तुम्हाला पतंजलीचे दूध, दही, छास, पनीर आणि पाणी सुद्धा मिळणार आहे. तसंच पतंजलीने शेतकऱ्यांसाठी सोलर लॅम्प सुद्धा लाँच केलाय. पतंजलीने गायीचे दूधाचे दर 40 रुपये प्रतिलिटर ठेवले आहे. जे बाजारात इतर उत्पादनापेक्षा 2 रुपयांनी स्वस्त असल्याचा दावा पतंजलीने केलाय.
कंपनीने दावा केलाय की, या सर्व उत्पादनांमध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नाहीये. ग्राहकांना शुद्ध दूध आणि दही मिळणार आहे. पतंजली आर्युवेदचे प्रवक्ते एस के तिजारावाला यांनी सांगितलं की, गायीचे दूध आणि त्यापासून तयार होणारे पदार्थ सर्वात कमी किंमतीत पतंजलीकडून मिळणार आहे.