अभिनेत्री आथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल यांच्या अफेअर्सची चर्चा सोशल मीडियावर सुरूच आहे.
दरम्यान आथियाने आपल्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती स्विमवेअरमध्ये आहे आणि ती खूपच हॉट दिसते आहे.
हाच तो फोटो आहे, जो आथियाने शेअर केला आहे, यावर कमेंट करताना राहुलने एक हार्ट इमोजी टाकलं आहे आणि जेफ (Jefa) असं लिहिलं आहे. हा स्पॅनिश शब्द असून याचा अर्थ बॉस असा होतो.
गेल्या काही दिवसांपासून आथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या अफेअर्सची चर्चा रंगते आहे. आथिया आणि राहुल दोघांनीही एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
तसंच दोघांना याआधीही एकत्र पाहण्यात आलं होतं. दरम्यान अजूनही दोघांनी याबाबत काहीही स्पष्ट केलेलं नाही.