
कोरोना लॉकडाऊनमुळे जवळपास सहा महिने शाळा बंद आहेत. लॉकडाऊन हळूहळू शिथील केला जातो आहे. अशात शाळाही आता सुरू करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहेत.

भारतात शाळा सुरू करण्याचा विचार सुरू आहे, तर अमेरिकेत काही शाळा सुरू झाल्या आहेत. त्याआधीच झालेल्या सर्वेक्षणात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार शाळा सुरू होण्याआधीच फक्त 2 आठवड्यात 97,000 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

अमेरिकेत एकूण 338,000 मुलांना कोरोना लागण झाली आहे, त्यापैकी जुलैच्या शेवटच्या दोन आठवड्यातच 97,000 मुलांना कोरोना झाला.

याआधी इज्राइललाही शाळा सुरू करण्याचा निर्णय महागात पडला. कोरोनाव्हायरसची प्रकरणं कमी होताच या देशाने शाळा सुरू केल्या आणि 261 जण कोरोना संक्रमित झालेत. त्यामुळे 6800 मुलांना क्वारंटाइन करण्यात आलं.




