खासगी ट्रेनचे काम हाती घेण्यासाठी विविध कंपन्या 8 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. 2023 पर्यत खासगी ट्रेन रेल्वे रुळावर धावावी, असा रेल्वेचा प्रयत्न आहे.
मंगळवारी खासगी रेल्वेसाठी लिलाव करण्यापूर्वी कंपन्यांसह पहिल्या बैठकीत 16 कंपन्या सहभागी झाल्या. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यात बॉम्बर्डिअर, कॅप इंडिया, आय-स्कायर कॅपिटल, IRCTC, BHEL, स्टर लाइट, मेधा, वेदांता, टेटला गर, BEML आणि RK असोसिएशन यांचा सहभाग आहे.
रेल्वे पहिल्याच बैठकीत 16 कंपन्यांच्या प्रतिसादामुळे खूश आहे. 12 ऑगस्ट रोजी दुसऱी बैठक आयोजित केली जाणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपन्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न नफ्याचा आहे.
रेल्वेच्या अंदाजानुसार ज्या 12 क्लस्टरसाठी कंपन्यासह करार होणार आहे, तेथे रेल्वे चालविल्यामुळे तब्बल 20 टक्के नफा होईल.
रेल्वेने बंगळुरू, चंदीगड, हावडा, जयपूर, पाटना, प्रयागराज, सिकंदराबाद, चेन्नई, दिल्ली आणि मुंबई यांचे दोन क्लस्टरमध्ये विभाजन केले आहे. भारतीय रेल्वेच्या अंदाजानुसार खासगी कंपन्यांमुळे रेल्वेत 30 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल.