[wzslider]05 सप्टेंबर : सालंकृत..नटलेला..लोभस रूप.. राज्यभरातून लोक गर्दी करतात..24-24 तास रांगेत उभं राहतात.. भक्तांपासून ते राजकारण्यापर्यंत, राजकारण्यापासून ते अभिनेत्यांपर्यंत ज्याच्या चरणी नतमस्तक होता अशा या लालबागचा राजाचं हे पहिलं दर्शन…पांढरं रंगाचं सोळं नेसलेला आणि दागिन्यांनी मढवलेली,सिहासनावर रूढ अशी राजाची मूर्ती आहे. विलोभनिय असं रूप डोळ्यात साठवण्यासाठी भक्तांची ओढ आता राजाच्या मार्गाकडे लागणार आहे. लालबागचा राजाचं हे 80 वे वर्ष आहे. आजपासून लालबागाचा राजा दर्शनासाठी खुला होणार आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन दाखवण्याचा बहुमान आयबीएन लोकमतला मिळालाय. आयबीएन लोकमतचं हे सलग पाचवं वर्ष आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.