मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /योगेंद्र यादव यांचा ओपनियन पोल ; गुजरातमध्ये काँग्रेसला 93 ते 113 जागा, भाजपला धक्का

योगेंद्र यादव यांचा ओपनियन पोल ; गुजरातमध्ये काँग्रेसला 93 ते 113 जागा, भाजपला धक्का

  13 डिसेंबर : प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक आणि एकेकाळचे आपचे सदस्य योगेंद्र यादव यांनी गुजरात निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी आपला अंदाज व्यक्त केलाय. त्यांनी गुजरातकरांचा कौल काँग्रेसच्या पारड्यात टाकलाय.

  स्वराज इंडिया पार्टीचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी आपला ओपनियन पोल टि्वटकरून जाहीर केलाय. योगेंद्र यादव यांनी तीन शक्यता वर्तवल्या असून यामध्ये त्यांनी भाजपचा पराभव होणार असल्याचा अंदाज वर्तवलाय.   काँग्रेसला 93 ते 113 जागा मिळतील असा अंदाज यादव यांनी व्यक्त केलाय. भाजपला पराभवाचा सामना करावा लागेल असं भाकीतही यादव यांनी वर्तवलंय.

  दुसरी शक्यता अशी वर्तवली आहे की, भाजपला 86 आणि काँग्रेस 95 जागा मिळतील. तर तिसऱ्या शक्यतेत भाजपाचा या पेक्षाही दारुण पराभव होण्याची शक्यता त्यांनी वर्तवलीये.

  यादव यांनी एबीपी न्यूज आणि सीएसडीएस यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या ओपिनियन पोलद्वारे आपला अंदाज वर्तवला आहे.

  First published:
  top videos

   Tags: BJP, Gujarat, Yogendra yadav