मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /पती व्हेंटिलेटरवर, दुसरीकडे पत्नीने मातृत्व सुखासाठी कोर्टात दाखल केली याचिका; न्यायाधीश हैराण

पती व्हेंटिलेटरवर, दुसरीकडे पत्नीने मातृत्व सुखासाठी कोर्टात दाखल केली याचिका; न्यायाधीश हैराण

पती गेल्या दोन आठवड्यांपासून व्हेंटिलेटरवर आहे. त्याच्याकडे शेवटचे 24 तास शिल्लक होते. यादरम्यान महिलेने न्यायालयात याचिका दाखल केली.

पती गेल्या दोन आठवड्यांपासून व्हेंटिलेटरवर आहे. त्याच्याकडे शेवटचे 24 तास शिल्लक होते. यादरम्यान महिलेने न्यायालयात याचिका दाखल केली.

पती गेल्या दोन आठवड्यांपासून व्हेंटिलेटरवर आहे. त्याच्याकडे शेवटचे 24 तास शिल्लक होते. यादरम्यान महिलेने न्यायालयात याचिका दाखल केली.

गांधीनगर, 21 जुलै: 'माझे पती मृत्यूशय्येवर आहेत. मात्र मला त्यांचं मुलं हवं आहे', अशी मागणी गुजरात हायकोर्टात एका महिलेने केली आहे. सध्या या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. 'मी माझ्या पतीकडून माृत्तव सुख मिळवू इच्छिते, मात्र कायदा याची परवानगी देत नाही. आमच्या प्रेमाची शेवटची निशाणी म्हणून मला पतीचा अंश असलेलं मुलं हवं आहे, डॉक्टरांनी सांगितलं की, माझ्या पतीकडे खूप कमी वेळ आहे. तो व्हेंटिलेटरवर आहे.'('My husband is dying. But I want their children')

गुजरात हायकोर्टाकडून (Gujrat High court) एका महिलेने अशी मागणी केली आहे. अहमदाबादमध्ये या महिलेचं सासर आहे. महिलेचा पती शेवटच्या घटका मोजत आहे. मंगळवारी जेव्हा हे प्रकरण कोर्टासमोर आलं तेव्हा न्यायालयातील सर्वजण काही वेळासाठी हैराण झाले. मात्र महिलेचं तिच्या पतीवर इतकं प्रेम आहे की, कायद्याचा सन्मान करीत तिने कोर्टाकडून पतीचे स्पर्म घेण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. (Woman seeks permission to court for husband's sperm while he is on death bed)

कोर्टाच्या मंजुरीनंतर स्टर्लिंग रुग्णालय (जेथे महिलेच्या पतीला भरती केलं आहे) तातडीने तयार झालं. त्यांनी सांगितलं की, आम्ही कोर्टाच्या निर्णयाचा आदर करतो. आता रुग्णालयाने स्पर्म घेतलं आहे आणि आयव्हीएफ ट्रिटमेंटची प्रक्रिय सुरू करण्याच्या तयारीत आहोत. स्टर्लिंग रुग्णालयाचे झोनल डायरेक्टर अनिल कुमार नांबियार यांनी सांगितलं की, कोर्टाच्या आदेशानंतर आम्ही तयारी सुरू केली होती. रुग्ण मरणासन्न अवस्थेत आहेत. अशावेळी रक्तस्त्राव रोखणे आणि इतर गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं.

हे ही वाचा-लग्नाच्या 3 महिन्यानंतर पतीचं खरं रुप समोर, कारसाठी पैसे न आणल्यानं पाजलं अ‍ॅसिड

काय म्हणाली महिला...

कॅनडामध्ये वर्षांपूर्वी आम्ही एकमेकांच्या संपर्कात आलो. आम्ही ऑक्टोबर  2020 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या चार महिन्यानंतर भारतात राहणाऱ्या सासऱ्यांना हार्टअटॅक आल्याचं कळालं. त्यानंतर फेब्रुवारी 2021 मध्ये मी पतीसोबत भारतात आले आणि त्याकाळात आम्ही सासऱ्यांची सेवा केली. यादरम्यान पतीला कोरोनाची लागण झाली. यावर उपचार सुरू होते. मात्र 10 मेनंतर त्यांची प्रकृती अधिक ढासळली. त्यानंतर त्यांना वडोदरा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्यांची प्रकृती दिवसागणिक बिघडत होती. फुप्फुसांना संसर्ग झाला होता आणि ते निकामी होत होते. माझे पती दोन महिन्यांपासून व्हेंटिलेटरवर जीवनाची संघर्ष करीत आहेत. तीन दिवसांपूर्वी डॉक्टरांनी महिला आणि तिच्या सासू-सासऱ्यांना खरी परिस्थिती सांगितली. महिलेचा पती फार काळ जणू शकणार नसल्याचं ऐकून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर महिलेने डॉक्टरांनी पतीच्या स्पर्म मधून मातृत्व धारण करण्याची मागणी केली. मात्र मेडिकल कायद्यानुसार हे मान्य नसल्यामुळे महिलेने न्यायालयाचं दार ठोठावलं.

सोमवारी डॉक्टरांनी सांगितलं की, पतीकडे केवळ 24 तास शिल्लक आहे. यानंतर महिलेने सोमवारी याचिका दाखल केली आणि दुसऱ्या दिवशी अर्जंट सुनावणी करण्याची मागणी केली. दुसऱ्या दिवशी जेव्हा कोर्टात हे प्रकरण ऐकून न्यायाधीशांपासून सर्वजण हैराण झाले. पुढील 15 मिनिटांत न्यायालयाने तिला स्पर्श घेण्याची परवानगी दिली.

First published:
top videos

    Tags: Gujrat, High Court, Marriage, Mother, One child