केंद्र सरकारने इंटरनेट सेवा पुरवणाऱ्यांकडून 827 अश्लील पॉर्न वेबसाइट बंद केल्या आहेत. यानंतर काही पॉर्न साईट्स बंद करण्यात आल्या पण काही पॉर्न साईट अजूनही सुरू आहेत. त्यामुळे यावर आता सुप्रीम कोर्टाने पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
सूत्रांच्या मते, उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हा निर्णय घेण्यात आला. 27 सप्टेंबर 2018 रोजी उच्च न्यायालयाने हा आदेश जारी केला होता.
तसं अमेरिकेनंतर इंटरनेट सेवा वापरणाता भारत हा दुसरा देश आहे. पॉर्न वेबसाईट पाहणाऱ्यांमध्ये भारतही आघाडीवर आहे. भारतात मोठ्या प्रमाणात पॉर्न साईट्स पाहिल्या जातात. 2017 मध्ये भारताचा यात 3 क्रमांक होता, तर 2014मध्ये अमेरिका यात पुढे होती.
तर 2018मध्ये गूगलने पॉर्न वेबसाईट पाहणाऱ्या देशाचे अकडे जाहीर केले होते. त्यात पाकिस्तान सगळ्यात पुढे होतं. तुम्हाला वाचून धक्का बसेल पण तेव्हा या वेबसाईट्सवर प्राण्यांचे पॉर्न व्हिडिओदेखील पाहण्यात आले होते.
इंटरनेटवरील पोर्न सर्च करणाऱ्यांमध्ये टॉपच्या 8 देशांमधील 6 देस मुस्लिम आहेत. यापैकी अश्लील व्हिडिओ सर्च करण्याच्या बाबतीत इजिप्त दुसरा आहे तर इराण, मोरोक्को, सौदी अरेबिया आणि तुर्की या क्रमवारीत चौथे, पाचवे, सातवे आणि आठव्या क्रमांकावर आहेत. लेबनान आणि तुर्की सोडले तर जवळजवळ सर्व अरब देशांमध्ये पॉर्नवर बंदी आहे.
यासंदर्भात 2015 मध्ये सौदी सरकारने 9 हजार ट्विटर अकाऊंट हॉक केले होते. तर यात काही लोकांना ताब्यातही घेण्यात आलं होतं.
पण पॉर्न वेबसाईट बंद केल्यामुळे त्याचे दुष्परिणामही होतील असं काही वेबसाईट चालवणाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता पॉर्न साईट्स बंद करून त्याचा काय फायदा होतो हेच पाहणं महत्त्वाचं आहे.