सोलापूर, 15 ऑक्टोबर : दक्षिण महाराष्ट्रात मुसळधार पावसानं धुमशान घातलं आणि कहर केला. राज्यातल्या अनेक भागांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली असून रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं आहे. रस्त्यांवर पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे त्यासोबत गाड्या वाहून गेल्या. अनेक घरांमध्ये धबधबे वाहत असल्यासारखं पाणी शिरलं तर काही ठिकाणी पुराचं पाणी आल्यानं नागरिकांचे हाल झाले. सोलापूर ग्रामीण परिसरातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
महामार्गावर मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी आल्याचं या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की तरुण पांढऱ्या रंगाची कार घेऊन पुराच्या पाण्यातून पलिकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे. या तरुणाला स्थानिक नागरिक हात हलवून पुढे येऊ नको असं ओरडून सांगत आहेत मात्र या तरुणापर्यंत आवाज जात नाही. तो कार घेऊन पुढे यायला निघतो आणि घात होतो.
खतरनाक! येऊ नको सांगत असतानाही ऐकलं नाही गाडी पुराच्या पाण्यातून पुढे आणली आणि...पुढे काय पाहा थरारक VIDEO pic.twitter.com/6GjJPcalPz
ही कार पुढे जाण्याऐवजी पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहायला लागते आणि कार चालकाचं नियंत्रण सुटतं. गाडी पाण्यासोबत वाहायला लागते. कारचालक स्वत:चा जीव वाचवण्यासाठी धडपडत असतो. ही थरारक दृश्यं कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
पुणे, कोल्हापूरसह राज्याच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर मोबाईल नेटवर्कवरही गंभीर परिणाम झाला. बराच काळ सेवा विस्कळीत झाली होती. हवामान विभागानं मुंबई-ठाणे, नवी मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आज रेड अलर्ट जारी केला आहे.