पावसामुळे अखेर तूर भिजली, अडवून ठेवलेली तूर नाफेड घेणार का ?

पावसामुळे अखेर तूर भिजली, अडवून ठेवलेली तूर नाफेड घेणार का ?

मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांची तूर भिजलीये. तूर नाकारण्यासाठी नाफेडला आयताच बहाणा मिळालाय.

  • Share this:

नरेंद्र मते, वर्धा

01 जून : तूर उत्पादक शेतकऱ्यांसमोरचा अडचणींचा डोंगर काही केल्या कमी होताना दिसत नाही. मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांची तूर भिजलीये. तूर नाकारण्यासाठी नाफेडला आयताच बहाणा मिळालाय.

वर्ध्याच्या बाजार समितीतली ही तूर.... ही तूर पावसाच्या पाण्यात भिजलीये. भिजलेल्या तुरीला पुन्हा मोडही आलेत. अगोदरच नाफेडचे अधिकारी छोट्या छोट्या कारणावरुन तूर रिजेक्ट करत असताना आता पावसानं तूर भिजल्यानं तूर नाकारण्यासाठी नाफेडला आयताच बहाणा मिळालाय.

बाजार समितीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचा आहे. पण बाजार समितीच्या शेडमध्ये व्यापाऱ्यांची तूर ठेवण्यात आलीये. तर उघड्यावर शेतकऱ्यांची तूर ठेवण्यात आलीये.

सरकारनं 31 मे नंतरही तूर खरेदीचे आदेश दिलेत. पण नाफेड अधिकाऱ्यांच्या उदासीन वृत्तीमुळे पुन्हा शेतकरीच नाडला गेलाय.

First published: June 1, 2017, 8:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading