Elec-widget

साधवान, तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये तर नाहीत ना पाकिस्तानी दहशतवादी!

साधवान, तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये तर नाहीत ना पाकिस्तानी दहशतवादी!

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाकिस्तानातून अश्लिल व्हिडिओचा भडिमार सुरू झाला. यामुळे ग्रुपमधील सदस्य घाबरून बाहेर पडले.

  • Share this:

पुणे, 11 जून : पाकिस्तानातून दहशतवादी भारतात प्रवेश करतात. पण आता व्हॉट्सअॅप ग्रुपमध्येही पाकिस्तानची घुसखोरी सुरू झाली आहे. ग्रुपमधल्या युवकांना पाकिस्तानातून व्हिडीओ कॉल केले जात आहेत. पाकिस्तानकडून आलेल्या या व्हिडिओ कॉलमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप वापरताना साधधान राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पाकिस्तानातून एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्रमण करण्यात आलं आहे.  पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाकिस्तानातून अश्लिल व्हिडिओचा भडिमार सुरू झाला. यामुळे ग्रुपमधील सदस्य घाबरून बाहेर पडले.

या ग्रुपमध्ये पाकिस्तानी युवकांनी युवती असल्याचं भासवून काहींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. ऍडमिनने हे क्रमांक काही काळातच ग्रुपमधून हटवले. मात्र काही युवकांना पाकिस्तानमधून व्हिडीओ कॉलही आले अशी माहिती सायबर सेलचे पीआय अशोक इंदलकर यांनी दिली आहे.

फेसबुकवरून काही दिवसांपूर्वी भारताच्या लष्करी जवानांना जाळ्यात ओढण्यात आलं होतं. त्यामुळे या अनुभवावरून व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे. तर आपण आपले नंबर कुठे शेअर करतो आणि कोणाला देतो याची माहिती असणं महत्त्वाचं आहे.

दरम्यान, ज्या नंबरवरून व्हिडिओ कॉल आले त्याचा पोलीस आणि सायबर सेलकडून अधिक तपास करण्यात येत आहे. तर आपला नंबर कोणत्याही अॅपवर शेअर करण्याआधी अॅपसंदर्भात संपूर्ण माहिती घ्या असा सल्लाही सायबर सेलकडून देण्यात आलं आहे.

Loading...

या सगळ्या प्रकारामागे नक्की कोणाचा हात आहे. यातून भारतीयांचा काही डेटा तर चोरला जात नाही ना याची माहिती घेण्याचं काम करण्यात येत आहे. पण या सगळ्या नागरिकांनी मात्र सतर्क राहण्याची गरज आहे.


मान्सूनपूर्व पावसाचा फळं बागायतीचा तडाखा, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या



 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 11, 2019 08:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...