उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएतर्फे व्यंकय्या नायडू यांचं नाव जाहीर

उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएतर्फे व्यंकय्या नायडू यांचं नाव जाहीर

उद्या सकाळी 11 वाजता व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरतील.

  • Share this:

17 जुलै : उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार म्हणून केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री व्यंकय्या नायडू यांचं नाव जाहीर करण्यात आलंय. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी यासंबंधीची अधिकृत घोषणा केली.उद्या सकाळी 11 वाजता व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरतील.

भाजपच्या संसदीय बैठकीत व्यंकय्या नायडू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. व्यंकय्या नायडू यांचे नाव जाहीर  झाल्यामुळे भाजपने दक्षिण भारताला पहिल्यांदाच मोठ्या पदावर प्रतिनिधीत्व दिलंय. व्यंकय्या नायडू हे आंध्रप्रदेशचे आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही यापूर्वी काम पाहिलंय. दरम्यान, यूपीएकडून गोपालकृष्ण गांधी यांच्या उमेदवारीची  यापूर्वीच घोषणा करण्यात आलीय.

 

 

First published: July 17, 2017, 7:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading