Birthday Special- रतन टाटांनी असा घेतला होता अपमानाचा बदला

Birthday Special- रतन टाटांनी असा घेतला होता अपमानाचा बदला

फार कमी लोक असे असतात जे आपल्या यशातून अपमानाचा वचपा काढतात. रतन टाटा हे त्यातलंच एक नाव.

  • Share this:

मुंबई, २८ डिसेंबर २०१८- Success is Best Revenge (यश संपादन करणं हाच सगळ्यात मोठा बदला आहे.) हे तर साऱ्यांनाच मान्य असेल. मात्र फार कमी लोक असे असतात जे आपल्या यशातून अपमानाचा वचपा काढतात. असे करणाऱ्यांमधलं देशातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे उद्योगपती रतन नवल टाटा. आज रतन टाटा यांचा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसादिवशी आज आम्ही तुम्हाला त्यांचा एक फार प्रसिद्ध किस्सा सांगणार आहोत.

गोष्ट १९९८ ची आहे. रतन टाटा यांनी टाटा मोटर्सची इंडिका कार लॉन्च केली होती. हे त्यांचं ड्रीम प्रोजेक्ट होतं. रतन टाटा यांनी या प्रोजेक्टसाठी दिवस रात्र एक केले होते, मात्र काही कारणांमुळे त्यांना या प्रोजेक्टमध्ये यश मिळाले नाही. टाटा मोटर्सला मोठं नुकसान सहन करावं लागलं. नुकसान भरपाई करण्यासाठी शेअरहोल्डर्सने कंपनीना विकण्याचा सल्ला दिला.

रतन टाटा कंपनी विकण्याचा प्रस्ताव घेऊन अमेरिकेत फोर्ड मोटरच्या मुख्य ऑफिसमध्ये गेले. त्यांच्यासोबत कंपनीचे शेअर होल्डर्सही होते. फोर्ड कंपनीसोबत रतन टाटा यांची तीन तास मीटिंग चालली. यादरम्यान, फोर्डच्या चेअरमनने रतन टाटा यांचा अपमान करत म्हटले की, ‘जर तुला व्यवसायाचं कोणतंही ज्ञान नव्हतं तर तू ही कार लॉन्च करण्यासाठी एवढा पैसा का गुंतवला. आम्ही तुझी कंपनी विकत घेऊन तुझ्यावर उपकार करत आहोत.’

कंपनी विकावी लागणार या विचारानेच रतन टाटा दुःखी होते. त्यात या बोलण्यामुळे ते पुरते हलले. मीटिंग अर्ध्यावर सोडून ते भारतात परतले. यानंतर त्यांनी टाटा मोटर्स न विकण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पुन्हा एकदा शुन्यापासून उभे केले आणि यावेळी कंपनीला नफा झाला.

२००८ पर्यंत टाटा मोटर्सचा नफा कित्येक पटींनी वाढला. तर फोर्ट कंपनी नुकसानात जाऊ लागली आणि लवकरच या कंपनीचं दिवाळं निघालं. फोर्डला सर्वात मोठं नुकसान रेंज रोवर आणि जग्वार या गाड्यांमुळे झालं होतं. रतन टाटा यांनी या दोन कंपन्या विकत घेण्याचा निर्णय घेतला.

या डीलसाठी विल फोर्ड आणि त्यांचे काही शेअरहोल्डर्स भारतात आले होते, तेव्हा त्यांनी रतन टाटा यांना म्हटलं होतं की, ‘तुम्ही आमची कंपनी विकत घेऊन आमच्यावर फार मोठे उपकार करत आहात.’

रतन टाटा हे फार लाजाळू व्यक्ती आहे. ते शक्य तितकं चंदेरी दुनिया आणि झगमगाटापासून लांब राहणं पसंत करतात. ते १९९१ पासून २०१२ पर्यंत टाटा ग्रुपचे चेअरमन होते. टाटा गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबईतील कुलाबा येथे पुस्तकांनी भरलेल्या एका घरात एकटे राहत आहेत.

SPECIAL REPORT : साप, अजगराला अंगावर खेळवणारी सर्प मैत्रीण!

First published: December 28, 2018, 10:47 AM IST

ताज्या बातम्या