टॉलिवूड ज्युनिअर एनटीआर हे नाव माहीत नाही अशी एकही व्यक्ती सापडणार नाही. २० मे १९८३ ला या मेगासुपरस्टारचा जन्म झाला. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील फार नावाजलेल्या अभिनेत्यांपैकी ज्युनिअर एनटीआर एक आहे. त्याच्या वडिलांचं नाव नंदमुरी हरिकृष्ण आणि आईचं नाव शालिनी भास्कर राव आहे. आज आम्ही तुम्हाला याच मेगास्टारच्या काही माहीत नसलेल्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत.
एनटीआरचे आजोबा एन.टी. रामा रावने त्याच्या पहिल्या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. फार कमी लोकांना हे माहीत आहे की, ज्युनिअर एनटीआरचं खरं नाव तारक आहे.
पहिला सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनी त्याला ज्युनिअर एनटीआर या नावाने हाक मारायला सुरुवात केली. तेव्हापासूनच त्याचं नाव तारक बदलून ज्युनिअर एनटीआर झालं.