आलियाचा आज वाढदिवस आहे. 28व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Alia Bhatt/Instagram)
सातवीत असताना तिनं चित्रपटात काम करण्यासाठी शाळा सोडण्याचा निर्णय घेतला होता. “माझ्यासाठी एखादा चित्रपट तयार करा” असा हट्ट तिनं वडिल मुकेश भट्ट यांच्याकडे केला होता. (Alia Bhatt/Instagram)
“मला गोविंदा, करिश्मा, सलमान यांच्यासारखा डान्स करायचा आहे. रोडवर, एअरपोर्टवर, गार्डनमध्ये जाऊन मला धम्माल करायची आहे. शाळेत फक्त नाट्यगृहांमध्येच नाचायला मिळतं.” अशी तक्रार तिनं केली होती. (Alia Bhatt/Instagram)
वडिलांनी बॉलिवूडमध्ये आलियाला लाँच केलं नाही म्हणून ती नाराज झाली खरी, पण तिच्यातील फिल्मी किडा पाहून करण जोहरनं त्याच्या ‘स्टुडण्ट ऑफ द ईअर’मध्ये आलियाला लाँच केलं. त्या वेळेस ती 20 वर्षांची होती. (Alia Bhatt/Instagram)
करणच्याच सांगण्यामुळे इम्तियाझ अलीने आलियाला तिच्या करिअरच्या सुरुवातीलाच ‘हायवे’सारखा अर्थपूर्ण चित्रपट दिला. (Alia Bhatt/Instagram)
हायवे या चित्रपटात तिनं केलेल्या अभिनयाची प्रचंड स्तुती करण्यात आली. मुकेश भट्टही तिचा अभिनय पाहून अवाक झाले त्यांनी तर आलियाचा ऑटोग्राफही घेतला अन् तो आपल्या ऑफिसमध्ये फ्रेम करुन ठेवला आहे. (Alia Bhatt/Instagram)
आलिया सध्या चित्रपटांसोबतच रणबीर कपूरसोबत असलेल्या नात्यामुळं देखील चर्चेत असते. (Alia Bhatt/Instagram)