लॉस एंजलिस (अमेरिका) 4 मार्च : हॉलिवूडचा एक काळ गाजवलेल्या एका लोकप्रिय स्टारच्या मृत्यूनंतर पुढे आलेल्या मृत्युपत्राने जगभर खळबळ उडाली आहे. कोट्यवधींची संपत्ती या अभिनेत्यानं दान करण्याचा निर्णय घेतला आणि असं करताना मुलाला फुटकी कवडीही न द्यायचंही त्यांनी लिहून ठेवलं आहे. कर्क डग्लस यांचा नुकताच मृत्यू झाला. त्यांचा मुलगा मायकल डग्लज हॉलिवूडचा सध्याचा मोठा स्टार आहे. त्याच्यासाठी एकही डॉलर मागे न ठेवण्याचं कारण काय? कर्क डग्लस या गतकाळच्या स्टारच्या मृत्यूच्या वेळी त्याच्याकडे 6.1 कोटी डॉलर्स पेक्षा जास्त (444 कोटी रुपये) संपत्ती होती. पण या स्टार ने आपल्या मुलाच्या मायकेलच्या नावाने या 444 कोटींपैकी एक पैसा सुद्धा ठेवलेला नाही. कर्क डग्लस यांनी त्यांच्या अप्रतिम अभिनयाच्या जोरावर तीन वेळा अभिनयासाठीचा ऑस्कर पुरस्कार जिंकला होता. जिवंतपणी जेवढी कर्क डग्लस यांच्या अभिनयाची, खाजगी आयुष्याची चर्चा झाली. तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त चर्चा त्याच्या मृत्यूनंतर मृत्युपत्रावरून होत आहे. वाचा - मलायकानं सांगितलं पूर्वायुष्यातलं धक्कादायक सत्य; वडील सोडून गेले आणि… सध्याचा हॉलिवूड स्टार मायकल डगलसच्या नावे एकही डॉलर वडिलांनी का ठेवला नाही याविषयी तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. सगळीच्या सगळी संपत्ती त्याने वेगवेगळ्या संस्थांना दान करण्याचं कर्क डग्लस यांनी मृत्युपत्रात लिहून ठेवलं आहे. विशेष ऑस्कर पुरस्काराने सन्मान स्वीकारतांना कर्क डगलस मुलाला वाटा का नाही? कर्क डग्लस ने त्याचा मुलगा आणि सध्याचा हॉलिवुड स्टार मायकल डग्लसला आपल्या संपत्तीत एकही पैसा दिलेला नाही. त्याच कारण सुद्धा कर्क डगलस ने स्वत:च दिलं आहे. मायलककडे स्वत:कडे सुमारे 300 कोटी डॉलर्सची म्हणजे (21,860 कोटी रुपये ) इतकी संपत्ती आहे. यामुळे त्याला माझ्या पैशांची गरज नाही असं स्पष्टपणे लिहिलं आहे. म्हणूनच कर्क यांनी आपली सगळी संपत्ती वेगवेगळ्या संस्थांना दान करण्याचा निर्णय आपल्या मृत्युपत्रात लिहिला आहे. मायकल डगलसचं म्हणणं काय? कर्क यांचा मोठा मुलगा आणि सध्याचा बॉलिवुडचा अभिनेता मायकल डग्लस याने आपल्या वडिलांच्या विविध आठवणींना इस्टाग्रामवर उजाळा दिला आहे. ‘हॉलिवूडच्या सोनेरे दिवसात माझे वडील मोठे अभिनेते होते. ते मानवतावादी होते आणि कायम न्यायाच्या बाजूने उभे राहीले होते. ते माझ्या मुलांचे एक उत्तम आजोबा होते, तर माझ्या आईसाठी ते एक उत्तम पती होते. ते माझे वडील होते याचा मला अभिमान आहे’, अशा शब्दात मायकल डग्लसने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. वाचा - रानू मंडलवर पुन्हा आली स्टेशनवर गाण्याची वेळ? चाहत्यांवर रागावणं पडलं महागात कर्क यांनी त्यांच्या कोणत्याही नातेवाईकाला एकही पैसा आपल्या मृत्यूनंतर दिलेला नाही. डगलस फाऊंडेशन च्या वेबसाईटनुसार यापूर्वी कर्क डगलस यांनी ३६४ कोटी रुपये गरजू विद्यार्थायंना शैक्षणिक मदतीच्या स्वरुपात दिले आहेत. ज्यांना शिष्यवृत्ती दिली ते सगळे विद्यार्थी हे मागस, आर्थिकदृष्या दुर्बल आणि गरजू होते. याशिवाय कर्क यांनी सिनाई मंदीर आणि मुलांच्या रुग्णालयासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली आहे. अन्य बातम्या मन हेलावून टाकणारी ती 13 मिनिटं, काजोलचा हा VIDEO एकदा पाहाच VIDEO : ‘सकाळीच चीनहून आलोय’, मेट्रोमध्ये मुलाचं बोलणं ऐकून रिकामी झाली मेट्रो