मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /मोलकरणीने दिवाळीआधी अख्खं घर केलं 'साफ'; तब्बल 2 कोटी आणि पन्नास लाखांचे दागिने गायब

मोलकरणीने दिवाळीआधी अख्खं घर केलं 'साफ'; तब्बल 2 कोटी आणि पन्नास लाखांचे दागिने गायब

तुमच्या घराची सुरक्षा तुमच्याच हातात आहे हेच या घटनेवरून सिद्ध होतं.

तुमच्या घराची सुरक्षा तुमच्याच हातात आहे हेच या घटनेवरून सिद्ध होतं.

तुमच्या घराची सुरक्षा तुमच्याच हातात आहे हेच या घटनेवरून सिद्ध होतं.

    दिल्ली, 6 नोव्हेंबर : आपल्यापैकी अनेकांच्या घरात वर्षानुवर्षे काम करणारे अनेक विश्वासू लोक असतात. पण कामासाठी नवीन व्यक्ती ठेवताना खात्री करून घेणं आवश्यक आहे असं वारंवार सांगितलं जातं. त्या व्यक्तीची सविस्तर माहिती, तिची ओळख, तिची ओळखपत्रे, पोलीस स्टेशनमध्ये तिची नोंदणी केली आहे का, तिनं आधी जिथं काम केलं आहे तिथून तिची पार्श्वभूमी बघणं गरजेचं आहे. या आधीही अनेक ठिकाणी नोकरांनी त्याच घरात गुन्हा केल्याची उदाहरणं आहेत. दिल्लीतल्या एका घटनेमुळेच हे आम्ही तुम्हाला पुन्हा सांगत आहोत. याबाबतचं वृत्त ‘आजतक’नं दिलं आहे.

    दिल्लीच्या पश्चिम विहार ईस्टमधील एका परिसरात एका व्यावसायिकाच्या पत्नीला धमकावून घरातून जवळपास दोन कोटी रुपयांची रोख रक्कम आणि 50 लाखांचे दागिने लुटण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्रसिंग हे पश्चिम विहारातील शुभम एनक्लेव्हमध्ये त्यांच्या कुटुंबीयांसह राहतात. त्यांचा मुंडका परिसरात डोअर फिटिंगचा कारखाना आहे. काही दिवसांपूर्वीच एका प्लेसमेंट एजन्सीच्या माध्यमातून त्यांनी मीना आणि हेमा नावाच्या दोन मोलकरणींना घरकामाला ठेवलं होतं. या दोघी घराच्या तळमजल्यावरील एका खोलीत राहत होत्या.

    दोन नोव्हेंबरला रवींद्रची पत्नी हरमीत कौर आणि त्यांचा मुलगा घरी होते. त्यावेळेस या मोलकरणीनं एका अनोळखी व्यक्तीला घरात घेतलं. त्याच्या हातात स्क्रू ड्रायव्हर होता. हरमीत कौरला मारण्याची धमकी देऊन तो तिला एका खोलीत घेऊन गेला. तेवढ्यात तिथं आणखी देन तरुण आले. या तिघांनी एक चादर फाडून त्या चादरीने हरमीत कौर आणि तिच्या मुलाला बांधलं. तेवढ्यात तिथं त्यांची भाची आणि वहिनी याही आल्या.त्यांनाही या चोरांनी बांधून ठेवलं आणि घरातील जवळपास दोन कोटी रुपये आणि पन्नास लाखांचे दागिने घेऊन हे चोर फरार झाले. त्यानंतर थोड्या वेळाने हरमीत कौरनं स्वत:ची कशीतरी सुटका करून घेतली आणि इतरांचीही सुटका केली. त्यानंतर या घटनेबद्दलची माहिती त्यांचे पती आणि पोलिसांना दिली.

    हे ही वाचा-ठाणे: पत्ते खेळणाऱ्यांना हटकल्याने बापलेकास बेदम मारहाण; लोखंडी रॉडने केले वार

    पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. त्यांनी चोरीची तक्रार दाखल करून घेतली आहे. या घटनेनंतर घरातील मोलकरीणही फरार झाली आहे. तिच्यासह अन्य तीन चोरांची ओळख पटवण्यासाठी आता प्लेसमेंट एजन्सीच्या मालकाचीही पोलीस चौकशी करत आहेत. तसंच या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही मदत घेतली जात आहे. पोलिसांनी चौकशीला सुरुवात केल्यावर या मोलकरणीच्या ओळखीनंच हे चोर घरात घुसल्याचं समोर आलं. काही दिवसांपूर्वीच एका प्लेसमेंट एजन्सीमार्फत ही नवी मोलकरणी रवींद्र यांच्याकडे कामाला लागली होती. आता पोलिसांचा तपास सुरु आहे.

    तुमच्या घराची सुरक्षा तुमच्याच हातात आहे हेच या घटनेवरून सिद्ध होतं. जर तुम्हाला कामासाठी नवीन व्यक्ती ठेवायची असेल तर तिची सगळी सविस्तर माहिती नक्की मिळवा. ती विश्वासू आहे ना याची खात्री करून घ्या आणि मगच तुमच्या घरात तिला परवानगी द्या.

    First published:

    Tags: Crime news, Diwali 2021, Thief