मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /सणासुदीच्या काळात गाडी चालवताना सावधान; तुमच्या छोट्याशा चुकीमुळे रद्द होईल Driver's license

सणासुदीच्या काळात गाडी चालवताना सावधान; तुमच्या छोट्याशा चुकीमुळे रद्द होईल Driver's license

traffic rules

traffic rules

देशातील मोटार व्हेईकल कायद्यामध्ये वेळोवेळी बदल होत असतो. यामध्ये जुने कालबाह्य झालेले नियम रद्द करून नवीन नियम आणले जातात. असेच काही नवीन नियम आहेत, ज्याद्वारे तुम्ही नियम मोडल्यास तुमचे लायसन जप्त होऊ शकते.

  नवी दिल्ली,  सणासुदीच्या काळात लोक खरेदीसाठी किंवा आप्तेष्टांच्या भेटीगाठी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. त्यामुळे या काळात रस्त्यांवर नेहमीपेक्षा काहीशी जास्त गर्दी दिसून येते. या काळात वाहतुकीच्या नियमांचंदेखील मोठ्या प्रमाणात उल्लंघन होतं. मात्र, या वर्षी सणासुदीच्या काळात बेजाबदार ड्रायव्हिंग (Rash Driving) करणं किंवा वाहतुकीचे नियम (Traffic Rules) मोडणं तुम्हाला अधिक महागात पडणार आहे. विशेषतः धनत्रयोदशी (2 नोव्हेंबर) आणि लक्ष्मी पूजनाच्या (4 नोव्हेंबर) दिवशी रस्त्यावर काळजीपूर्वक वाहन चालवा. कारण, वाहतूक नियमांचं उल्लंघन करताना जर तुम्ही आढळलात तर तुमच ड्रायव्हिंग लायसन्स (driving licence) देखील रद्द होऊ शकतं.

  देशात नवीन मोटार वाहन कायदा (Motor Vehicles Amendment Act 2019) लागू करण्यात आलेला आहे. या कायद्यात रस्ते अपघात टाळण्यासाठी अनेक ठोस तरतुदी करण्यात आल्या आहेत. वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल होणारा दंड (Penalty) अधिक कडक करण्यात आला असून दंडाची रक्कम पूर्वीपेक्षा कित्येक पटीने वाढवण्यात आली आहे. याशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स (DL), आरसी (RC) आणि मोटर इन्शुरन्स (Motor Insurance) सारख्या नियमांमध्येही मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळं तुमची एक छोटीशी चूक देखील तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यासाठी पुरेशी ठरू शकते.

  प्रत्येकाने वाहन चालवताना काही गोष्टी विशेष ध्यानात ठेवाव्यात. बेजबाबदारपणे किंवा दारू पिऊन गाडी चालवू नये. जर असं करताना एखादा व्यक्ती आढळल्यास त्याला जास्त रकमेचा दंड आकारला जाणार आहे. जर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स कालबाह्य म्हणजेच एक्सपायर झालेलं असेल तर कायद्यानुसार तुम्ही गाडी चालवू शकत नाही. पूर्वी अनेक जण लायसन्स एक्सपायर झालेलं असूनही बेधडकपणे गाड्या चालवत होते. त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी आता कडक नियम करण्यात आले आहेत. हेल्मेटचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा नियम आहे तरी देखील हेल्मेट नसलेल्या चालकांची संख्या अजूनही जास्त आहे. याशिवाय आता प्रदूषण प्र-माणपत्रासारखी कागदपत्रेही पूर्वीच्या तुलनेत अद्ययावत ठेवली जात आहेत.

  नवीन नियमांनुसार, पोलीस किंवा वाहतूक अधिकाऱ्यांशी वाईट वर्तणूक, त्यांनी वाहन थांबवायला सांगितल्यानंतर वाहन न थांबवणं, ट्रकच्या केबिनमध्ये प्रवाशांना बसवणं हेदेखील गुन्हे मानले गेले आहेत. एखाद्या व्यक्तीनं असं केल्यास त्याचं ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित किंवा रद्द केलं जाऊ शकतं. तसेच दंडही आकारला जाऊ शकतो. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घालून दिलेल्या नवीन नियमांनुसार, बस-टॅक्सीमध्ये जास्त प्रवासी बसवणं, प्रवाशांसोबत गैरवर्तन करणं, स्टॉपवर गाडी न थांबवण, बस चालवताना धूम्रपान करणं, दारू पिऊन गाडी चालवणं, गरज नसताना अतिसावकाश गाडी चालवणं या गोष्टी देखील ड्रायव्हरला महागात पडतील.

  नवीन वाहन कायद्यात सर्व गोष्टी डिजिटल केल्यामुळं, कागदपत्रांच्या कॉपी सोबत बाळगण्याच्या त्रासापासून सुटका झाली आहे. वाहतूक पोलीस आणि आरटीओला दंडाची रक्कम आणि चालकांवर केलेल्या कारवाईची नोंद संबंधित विभागाच्या पोर्टलवर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या नियमांचं आणि डिजिटल व्यवहारांचे फायदे-तोटे दोन्ही आहेत. पण तुम्ही सावध राहिलात तर तुम्हाला नक्कीच सुरक्षित प्रवास करता येईल इतकं मात्र नक्की.

  First published:

  Tags: Traffic Rules, Traffic signal