अख्खा महाराष्ट्र पाहत राहिला; शपथविधीसाठी नगरमधील सरपंचसाहेबांची हेलिकॉप्टरने एन्ट्री, पाहा VIDEO

अख्खा महाराष्ट्र पाहत राहिला; शपथविधीसाठी नगरमधील सरपंचसाहेबांची हेलिकॉप्टरने एन्ट्री, पाहा VIDEO

गावभर सनई चौघड्यांचा निनाद दुमदुमत होता..ढोल ताशांचा गरज...आबाल-वृद्ध लेझीम खेळण्यात गुंग झाले होते. अंगावर शहारा आणणारं हे दृश्य अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात पाहायला मिळालं.

  • Share this:

संगमनेर, 12 फेब्रुवारी : गावभर सनई चौघड्यांचा निनाद दुमदुमत होता..ढोल ताशांचा गरज...आबाल-वृद्ध लेझीम खेळण्यात गुंग झाले होते. अंगावर शहारा आणणारं हे दृश्य अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात पाहायला मिळालं. ही तयारी कोणा नेत्याच्या मुलाच्या लग्नाची तयारी नाही तर संरपंचपदाची शपथ घेण्यासाठी समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. एखाद्या मुख्यमंत्र्यालाही लाजवेल असा शपथविधी येथे पार पडला.

विशेष म्हणजे सरपंचसाहेबांनी शपथ घेण्यासाठी थेट हेलिकॉप्टरनेच एन्ट्री घेतली. त्यानंतर अख्खं गाव भावुक होऊन आपल्या नेतृत्वाकडे पाहत होतं.

अख्ख्या गावातील महिला फेटे बांधून सज्ज होत्या. सरपंचांचे हेलिकाॅप्टरने आगमन सोहळा पाहण्यासाठी गाव लोटला होता. असा नयनरम्य सोहळा आज अहमदनगर जिल्ह्यात रंगला होता. एखाद्या मुख्यमंत्र्याला लाजवेल असा सरपंचसाहेबांचा शपथविधी पार पडला. सरपंचांचे हेलिकाॅप्टरने आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आलं. बारा बैलाच्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला गावात हा शपथविधी सोहळा रंगला होता.

गावातील उद्योजक तरूण जालींदर गागरे यांच्या पुणे येथे विविध कंपन्या आहेत. शेकडो तरूणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. जालिंदर गागरे पुण्यात राहत असले तरी त्यांची आपल्या गावाशी नाळ जोडलेली आहे. गावाचा सर्वांगिण विकास करण्याच्या ध्येयाने त्यांनी गावची निवडणूक लढवली आणी त्यांचा संपूर्ण पॅनल बहूमताने विजयी झाला.. योगायोगाने सरपंचपद सर्वसाधारण पुरूषाचे निघाल्याने जालिंदर गागरे आज सर्वानुमते सरपंचपदी विराजमान झाले आहेत. गावचा विकास हेच ध्येय असल्याचं जालींदर गागरे म्हणतात.

ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडतो, तशाच पद्धतीने आज ग्रामपंचायत सदस्य आणी सरपंच उपसरपंच यांनी गावच्या विकासाची शपथ घेतली. गावाकडे चला हा नारा गांधीजींनी दिला होता त्याच ध्येयाने मी गावात आलो असून आजचा सोहळा अविस्मरणीय व्हावा यासाठी हेलिकाॅप्टरने आल्याचं गागरे म्हणताहेत.

गावचा विकास करण्याचा ध्यास असलेला सरपंच लाभल्याने आज गावही आनंदी आहे.  अशाच पद्धतीने राज्यातील प्रत्येक गावातील सुशिक्षित उद्योजक जर पुढे आले तर गाव सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही...

Published by: Meenal Gangurde
First published: February 12, 2021, 4:44 PM IST

ताज्या बातम्या