मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /या महिलेला वजन कमी करण पडलं महागात, 152 किलो वजन कमी केलं अन्...

या महिलेला वजन कमी करण पडलं महागात, 152 किलो वजन कमी केलं अन्...

एका महिलेनं वजन कमी करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. त्यात ती यशस्वीही झाली. पण त्यानंतर तिच्या शरीराची जी अवस्था झाली ती बघून अनेकांना धक्का बसला आहे.

एका महिलेनं वजन कमी करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. त्यात ती यशस्वीही झाली. पण त्यानंतर तिच्या शरीराची जी अवस्था झाली ती बघून अनेकांना धक्का बसला आहे.

एका महिलेनं वजन कमी करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. त्यात ती यशस्वीही झाली. पण त्यानंतर तिच्या शरीराची जी अवस्था झाली ती बघून अनेकांना धक्का बसला आहे.

  नवी दिल्ली, 4 एप्रिल : लठ्ठपणामुळे (Obesity) आरोग्याच्या अनेक तक्रारी उद्भवू शकतात.अनेक आजारांना लठ्ठपणामुळे आमंत्रण दिलं जातं. लठ्ठपणाशी लढणं किंवा वजन कमी करणं हे अनेकांसाठी अत्यंत कठीण असतं. शारीरिकदृष्ट्या तर लठ्ठपणामुळे त्रास होतोच पण मानसिकदृष्ट्याही ताण येऊ शकतो. आपलं वजन कमी करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणारे अगदी कमीजण असतात. अमेरिकेतील एका महिलेनं वजन कमी करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले (Woman weight loss journey). त्यात ती यशस्वीही झाली. पण त्यानंतर तिच्या शरीराची जी अवस्था झाली ती बघून अनेकांना धक्का बसला आहे.

  अमेरिकेतील न्यूजर्सीमध्ये (New Jersey, America) राहणारी 28 वर्षांची ॲना (Anna) लहानपणापासूनच खूप जाड होती. अगदी ती चार वर्षांची असल्यापासून ओव्हरवेट (Weight loss transformation) होती असं तिच्या आईनं सांगितल्याचं द सन या वेबसाईटच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. तिचं वजन जेव्हा सगळ्यांत जास्त होतं तेव्हा ती शारीरिक तणावाखाली तर होतीच; पण तिला मानसिक तणावाचाही सामना करावा लागत होता. तिनं कितीही प्रयत्न केले किंवा डॉक्टरांनीही अनेक उपचार केले तरी तिचा लठ्ठपणा कमी होत नव्हता उलट वाढतच होता.

  लग्न झाल्यानंतर ॲनानं वजन कमी करायचंच असा निश्चय केला. तिनं चालणं सुरु केलं आणि भरपूर व्यायमही केला. तिच्या मुलीसाठी तिला बारीक व्हायचं होतं. अनेक प्रयत्नांनतर अखेर तिचं वजन भरपूर कमी झालं खरं. पण त्यामुळे आणखी एक नवी समस्या उद्भवली. अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात वजन कमी झाल्यामुळे तिच्या शरीराची कातडी अक्षरश: लोंबकळायला लागली. ॲनानं चक्क 152 किलो वजन कमी केलं होतं. पण तिच्या पोट, हात आणि जांघेजवळची कातडी अक्षरश: लोंबकळू लागली होती. इतकं वजन कमी केल्यावर तिला आपल्या शरीराचा तिरस्कार वाटू लागला. ती जाड होती तेव्हा वाटायचा तसाच तिला आपल्या शरीराचा पुन्हा राग येऊ लागला.

  हे ही वाचा-वजन जास्तच वाढत असेल तर दुर्लक्ष करणं अंगलट येईल; या 4 टेस्ट केलेल्या बऱ्या

  या सगळ्यानंतर तिनं ही अतिरिक्त चरबी काढून टाकण्यासाठी वेट लॉस सर्जरी म्हणजेच वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचं ठरवलं. सर्जरी झाल्यानंतर तिला स्वत:कडे बघून खूप अभिमान वाटू लागला. कारण तिचं पोटही आता सपाट झालं होतं. तिची लोंबकळणारी कातडी आता दिसत नाही. तिची फिगरही अगदी उत्तम झाली आहे. तिला आता मुलीबरोबर बाहेर फिरायला जाणं टाळावंसं वाटत नाही. उलट तिच्यात एक नवा आत्मविश्वास आला आहे. आता ती स्विमसूटही घालू शकते.

  पण वजन कमी करताना योग्य प्रकारे सल्ला न घेतल्यास जीवावर बेतू शकतं किंवा एखाद्या गंभीर समस्येला आमंत्रण दिलं जाऊ शकतं. त्यामुळे जास्त प्रमाणात वजन कमी करायचं असेल तर वैद्यकीय सल्ला अवश्य घ्या.

  First published:

  Tags: Health, Obesity, Weight loss