ठाण्यात प्रो-गोविंदा स्पर्धेत 10 थरांसाठी मनसे देणार...!

ठाण्यात प्रो-गोविंदा स्पर्धेत 10 थरांसाठी मनसे देणार...!

  • Share this:

ठाणे, 03 सप्टेंबर : आज श्रीकृष्णचा जन्मदिवस आहे. अर्थातच श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ठाण्यात प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने प्रो-गोविंदा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत मनसे 10 थरांसाठी 21 लाखांच बक्षीस देणार आहे.

ठाण्यात आणखी एका दहीहंडीला १० थरांसाठी २५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. या मंडळाचे नाव स्वामी प्रतिष्ठान असून पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दहीहंडीला उपस्थिती लावणार आहेत.

ठाण्यातील हिरानंदानी मोडेज भागात पहिल्यांदाच स्वामी प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी मोहोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये बिग बॉसच्या पहिल्या सिझमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने ही दहीहंडी फोडली. यावेळी शर्मिष्ठा राऊत, माधव देवचाके, रिचा श्रीवास्तव हे देखील उपस्थित होते. शेलार मामा दहीकला मंडळाच्या साथीने 4 थर रचून स्मिताने ही दहीहंडी फोडली.

तर दुसरीकडे मुंबईतले डबेवाले पुणे शहरातील कोथरूड, भोसरी या भागांसह कामशेत, तळेगाव, चाकण, राजगुरूनगर या ग्रामीण भागातील बऱ्याच दहीहंडी फोडणार आहेत. त्यासाठी त्यांना खास आमंत्रण मिळाली आहेत.

 

 Success Story: रिक्षावाल्याच्या मुलीने देशाला दिले सुवर्णपदक

First published: September 3, 2018, 8:21 AM IST

ताज्या बातम्या