जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / क्रिप्टोकरन्सीचा महाघोटाळा ठाण्यात उघडकीस, 250 कोटी रुपयांची फसवणूक

क्रिप्टोकरन्सीचा महाघोटाळा ठाण्यात उघडकीस, 250 कोटी रुपयांची फसवणूक

क्रिप्टोकरन्सीचा महाघोटाळा ठाण्यात उघडकीस, 250 कोटी रुपयांची फसवणूक

जगात क्रिप्टो करन्सीने सगळ्यांना भुरळ घातली आहे. जगाच्या कोणत्याही कोप-यात बसून क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करुन अनेकांनी लाखो करोडो रुपये कमावलेत. अशा अनेक घटना सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या पहायला मिळतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

ठाणे, 20 सप्टेंबर : सध्या क्रिप्टो करन्सीने जगभरात धुमाकूळ घातला असून यामुळे मोठा परतावा मिळतो. म्हणून बेकायदेशीर असले, तरीही लोक क्रिप्टो करन्सीमध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत. पण याचाच फायदा उठवत गुंतवणूकदारांची फसवणूक देखील मोठ्या प्रमाणात केली जात आहे. असाच एक मोठा फसवणूकीचा प्रकार ठाणे पोलिसांनी उघडकीस आणला आहे. जगात क्रिप्टो करन्सीने सगळ्यांना भुरळ घातली आहे. जगाच्या कोणत्याही कोप-यात बसून क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करुन अनेकांनी लाखो करोडो रुपये कमावलेत. अशा अनेक घटना सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या पहायला मिळतात. अशा प्रकारांना बळी जावून भारतात ही मोठ्या प्रमाणात क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक वाढलीये. याचाच फायदा अनेक उच्च शिक्षित तरुण घेत असून आपली हुशारी लोकांच्या फायद्यासाठी नाही तर लोकांचे नुकसान करण्यात घालवत आहे. असाच एक प्रकार ठाण्यात उघडकीस आला. क्रिप्टो करन्सीकरता कोणते निर्बंध नाहीत की कोणते कायदे हे माहिती असून देखील लोक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताहेत याचाच फायदा घेत लोकांची फसवणूक केल्याचा प्रकार ठाण्यात समोर आला आहे. ज्यात १ दोन नाही तर तब्बल १ हजार ४४१ जणांची जवळपास अडीचशे कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. अगदी सराईतपणे एक एप्लिकेशन तयार करुन लोकांची फसवणूक केली जात होती. MAGIC 3x नावाने रितेशने वेबपेज सुरु केले होते आणि ज्यांनी गुंतवणुक केलीये त्यांना तो SMP नावाने कॅाईन द्यायचा याकरता एक वेबसाईट त्याने तयार केली होती. SMP ही बनावट क्रिप्टो करन्सी होती. तर वर्षभरात दुप्पट परतावा देतो असं आमिष देखील रितेशने दाखवलं होतं. यालाच भूलन ठाण्यातील ४ जणांनी तब्बल ४४ लाख रुपये गुंतवले होते. पण कालातरांने आपली फसवणुक झाल्याचे त्यांना लक्षात आले आणि त्यांनी आर्थिक गुन्हे शाखा ठाणे येथे गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी रितेश पांचाळ उर्फ रितेश सिकलगीर याला अटक केली आणि या रितेशने देशभरात जवळपास १ हजार ४४१ लोकांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणी एकूण ३ जणांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. रितेश पांचाळ, मोहन पाटील आणि सेवाराम जैसवानी रितेश हा मुख्य मास्टर माईंड होता तर मोहन आणि सेवाराम एजंट होते. तर रितेशची ३ बॅंक खाती पोलिसांनी गोठवली आहेत. पण धक्कादायक म्हणजे फसवणूक झालेल्या १ हजार ४४१ जणांपैकी फक्त २२ जणच समोर आलेत उर्वरित १ हजार ४१९ जण अजुनही समोर आले नाहीत. त्यामुळे ठाणे पोलिसांनी गुंतवणूकदारांना तक्रार दाखले केलं आहे. जेणेकरुन अशा आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल यासाठी प्रयत्न करता येतील

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात