वैभव सोनवणे, पुणे, 29 जुलै : पुणे एटीएसने कोथरूडला पकडलेल्या दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविल्याप्रकरणी रत्नागिरीतून एका संशयितला अटक केली आहे. याप्रकरणात आतापर्यंत चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आलीय. इम्रान खान आणि मोहम्मद युनिस साकी यांना २३ जुलै रोजी कोथरूड पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर तपासात मिळालेल्या माहितीवरून अबदुल कादीर दस्तगीर याला या दोघांना आश्रय दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आता चौथ्या संशयिताला अटक करण्यात आली असून आज त्याला कोर्टात हजर करण्यात आल आहे. एटीएसने पोलिसांकडून गेल्या आठवड्यात दोन संशयितांना आश्रय दिल्या प्रकरणी पुण्यातील एका व्यक्तीला अटक केलीय. एटीएसने गुरुवारी माहिती देताना सांगितलं होतं की, दोन्ही संशियत दहशतवाद्यांकडून अनेक गोष्टी जप्त केल्या आहेत. यात स्फोटक पावडर, लॅपटॉप, ड्रोनचे भाग, नकाशा, इलेक्ट्रिक सर्किट, अरबीमध्ये लिहिलेल्या काही वस्तुही आढळल्या होत्या. पोलीस भरती स्वप्नच राहिलं; ठाण्यातील तरुणानं संपवलं आयु्ष्य, सुसाईड नोटमध्ये वाहतूक पोलिसांची नावं पुण्यातील न्यायालयाने दोन्ही संशयित मोहम्मद इमरान मोहम्मद युनुस खान आणि मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी यांना २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पोलीस कोठडीत २५ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. दरम्यान, एटीएसने पुण्यात अब्दुल कादिर दस्तगीर पठाण नावाच्या व्यक्तीला खान आणि साकी यांना आश्रय देण्याच्या आरोप केला होता. खान आणि साकी हे दोघेही जयपूर बॉम्बस्फोटातील फरार आरोपी असून त्यांना पुण्यात कोथरूड पोलिसांनी अटक केली होती. एनआएने गुन्हा दाखल केल्यानंतर दोघे मार्च २०२२ मध्ये मुंबईत आले होते. तिथून ते पुण्यातील कोंढव्यात राहत होते. पुण्यात अब्दुल कादिर दस्तगीर पठाणशी ओळख झाल्यानतंर आम्हाला कामाची गरज असल्याचं त्यांनी पठाणला सांगितलं. तेव्हा पठाणने त्यांना ग्राफिक्स डिझाइनचं काम दिलं. तसंच दोघांना चेतना गार्डनमध्ये अन्वर अली इद्रिस यांच्या मालकीची खोलीही भाड्याने रहायला घेऊन दिली. पठाणची चौकशी केली असता खान आणि साकी यांची दहशतवादी पार्श्वभूमी माहिती असतानाही खोली राहण्यासाठी दिल्याचं आढळून आलं. पठाण दोघांना पैसे कसे देत होता? दहशतवाद्यांना कोणत्या संघटना, संस्था मदत करत होत्या याचाही तपास केला जात असल्याची माहिती पुणे एटीएसने दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.