‘आशिक बनाया आपने’ (Aashiq Banaya Aapne) या चित्रपटातून रातोरात प्रसिद्ध झालेली तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) ही बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जायची. (Tanushree Dutta/Instagram)
या चित्रपटात तिनं अभिनेता इमरान हाशमीसोबत केलेल्या इन्टिमेट सीन्समुळं त्याकाळी तिला बॉलिवूडची किसिंग क्वीन असंही म्हटलं जात होतं. (Tanushree Dutta/Instagram)
परंतु ‘हॉर्न ओके प्लिज’ (Horn Ok Please) या चित्रपटादरम्यान अभिनेता नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्यासोबत झालेल्या मतभेदांमुळं तिचं करिअर एकाएकी संपली. (Tanushree Dutta/Instagram)
आता जवळपास 12 वर्षानंतर ती पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याची तयारी करत आहे. (Tanushree Dutta/Instagram)
आज तनुश्रीचा वाढदिवस आहे. आपल्या 37व्या वाढदिवसाच्या निमित्तानं एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून तिनं हा सुखद धक्का आपल्या चाहत्यांना दिला. (Tanushree Dutta/Instagram)
तनुश्री सध्या पुनरागमन करण्याची जोरदार तयारी करत आहे. ती तासंतास जीममध्ये व्यायाम करत आहे. (Tanushree Dutta/Instagram)
गेल्या एक वर्षात तिनं तब्बल 18 किलो वजन कमी केलं आहे. शिवाय तिनं आपल्या नव्या लूकचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Tanushree Dutta/Instagram)
या फोटोंमधील तिचा नवा अंदाज पाहून चाहते देखील अवाक झाले आहेत. सध्या ती विविध चित्रपटांसाठी ऑडिशन देत आहे. (Tanushree Dutta/Instagram)
तिच्याकडे काही चांगल्या पटकथा देखील आल्या आहेत. परंतु तिला नेहमीपेक्षा वेगळी भूमिका साकारायची आहे. (Tanushree Dutta/Instagram)
तिला पहिल्यासारखं केवळ बोल्ड व्यक्तिमत्व पडद्यावर दाखवायचं नाही त्यामुळं ती विचार करुनच चित्रपटांची निवड करणार आहे. (Tanushree Dutta/Instagram)