ऑस्ट्रेलियानं आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2021 (ICC T20 World Cup 2021) स्पर्धेचं विजेतेपद पटकावले आहे. त्यांनी फायनलमध्ये न्यूझीलंडचा 8 विकेट्सनं पराभव केला. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसनची 85 रनची खेळी व्यर्थ ठरली. पाच वेळा वन-डे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदाच टी20 वर्ल्ड कप जिंकला. या ऐतिहासिक कामगिरीचे 5 जण शिल्पकार आहेत. (PIC: AP)
वॉर्नरचं अर्धशतक: ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरनं फायनल मॅचमध्ये अर्धशतक झळकावलं. त्यानं 38 बॉलमध्ये 4 फोर आणि 3 सिक्स लगावत 53 रन काढले. ऑस्ट्रेलियाच्या विजयात वॉर्नरचे योगदान मोलाचे होते. (PIC: AP)
मिचेल मार्श ठरला हिरो : कॅप्टन आरोन फिंच फक्त 5 रनवर आऊट झाल्यानंतर मार्श बॅटींगसाठी मैदानात आला. त्यानं ऑस्ट्रेलियन इनिंगची सूत्रं हाती घेतली. मार्शनं 50 बॉलमध्ये 6 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीनं नाबाद 77 रन काढले. वॉर्नर आऊट झाल्यानंतर त्यानं मॅक्सवेलच्या मदतीनं ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. (PIC: AP)
मॅक्सवेलनं दिली साथ: वॉर्नर आऊट झाल्यानंतर न्यूझीलंडची आशा वाढली होती. त्यावेळी ग्लेन मॅक्सवेलनं मिचेल मार्शची साथ देत ऑस्ट्रेलियालाच्या हातातून मॅच निसटू दिली नाही. 4 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं मॅक्सवेलनं 28 रन काढले. मॅक्सवेलनं टीम साऊदीला फोर लगावत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. (PIC: AP)
हेजलवूडनं घेतल्या 3 विकेट्स: ऑस्ट्रेलियाकडून जोश हेजलवूड सर्वात यशस्वी बॉलर ठरला. त्यानं 4 ओव्हर्समध्ये फक्त 16 रन देत 3 विकेट्स घेतल्या. हेजलवूडनं डॅरेल मिचेल, केन विल्यमसन आणि ग्लेन फिलिप्स यांना आऊट करत न्यूझीलंडला 172 रनवर रोखलं. हेजलवूडनं सुरुवातीला विल्यमसनचा कॅच सोडला होता. पण, अखेर त्यानंच न्यूझीलंडच्या कॅप्टनला आऊट केलं. (PIC: AP)
झम्पानं लावला ब्रेक : या संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या अॅडम झम्पानं फायनलमध्येही चांगली बॉलिंग करत न्यूझीलंडच्या इनिंगला ब्रेक लावला. त्यानं 4 ओव्हरमध्ये 26 रन देत मार्टीन गप्टीलची विकेट घेतली. (PIC: AP)