नवी दिल्ली, 22 आॅक्टोबर : लग्नासाठी मुलाचं वय 21 वरुन 18 पर्यंत कमी करण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. तसंच याचिकाकर्त्याला 25 हजारांचा दंडही ठोठावला आहे.
यापूर्वी विधी मंत्रालयाने देखील सर्व धर्मांच्या मुली आणि मुलांचे लग्नाचे वय १८ वर्षे करण्याबाबत सुचवले होते. जर निवडणुकांमध्ये मत देण्यासाठी सर्वांना एकाच वयाची अट असते तर आपला जीवनसाथी निवडण्यासाठीही तोच नियम लागू होऊ शकतो असं मतही नोंदवण्यात आलं होतं.
दरम्यान, लग्नासाठी मुलाचं वय मुलींप्रमाणे 18 करण्यासाठी अशोक पांडे या वकिलानंही याचिका केली होती, जी आज सर्वोच्च न्यायालायनं फेटाळून लावली. तसंच कोर्टाने अशोक पांडे यांना पंचवीस हजार रुपयांचा दंडही सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला.
विधी मंत्रालयाने असंही म्हटलं होतं की, बाल विवाह थांबवण्यासाठी वयाची असमानता संपवायला हवी. लग्नासाठी पुरुषांचे वय २१ वर्षे आणि मुलीचे वय १८ वर्षे असल्याने रुढीवादाला प्रोत्साहन मिळते. कारण यामध्ये पत्नीने पतीपेक्षा वयाने लहान असायला हवं असं मानलं जातं. तर मुस्लिम पर्सनल लॉमध्ये मुलाने किंवा मुलीने युवावस्था प्राप्त केल्यानंतर त्यांचा विवाह वैध मानला जातो.
=============================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India, Marriage, Supreme court, सुप्रीम कोर्ट