UK मधील महिलेने एक रिलेशनशिप पोर्टलवर एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिने या पोर्टलवर सांगितलं की, लॉकडाऊनदरम्यान कशाप्रकारे तिने आपल्या प्रियकराची टेस्ट घेतली. महिलेने सांगितलं की, काही वर्षांपूर्वी ती आणि जॉर्ज टिंडरवर भेटले होते. त्यावेळी महिलेचं वय 16 होतं. आणि एप्रिलमध्ये तिने आपल्या प्रेमाचा सहावा वाढदिवस साजरा केला.
महिलेने सांगितलं की, दोघांचं नातं पहिल्यापेक्षा अधिक मजबूत झालं आहे. तिने लोकांक़डे याचं एक सिक्रेट शेअर केलं. एखादी वस्तू खरेदी करण्यापूर्वी ते ट्राय केलं जातं, हादेखील काहीसा तसाच प्रकार आहे.
महिलेने सांगितलं की, टीनएज रोमान्समध्ये आम्ही दोघे अधिकतर एकमेकांपासून लांब राहत होते. इंजिनिअरिंगसाठी जॉर्ज स्टॅफोर्डशायर गेला होता. 2 वर्षांनंतर मीदेखील भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी मॅनचेस्टरला गेले. आम्हा दोघांसाठी हे अवघड होतं. मात्र कसंबसं आम्ही सुट्टीच्या दिवशी भेटत होतो.
महिलेने पुढे लिहिलं की, 2019 मध्ये जॉर्जला दुसऱ्या शहरात नोकरी मिळाली. त्यामुळे त्याला नेहमी प्रवास करावा लागत होता. त्यामुळे आमच्यातील अंतर वाढलं. तरीही आमचं लॉन्ग डिस्टन्सरिलेशनशीप सुरू होतं. मीदेखील एके ठिकाणी पार्ट टाइम नोकरी करायला सुरुवात केली. मार्च 2020 मध्ये कोरोनामुळे क्लासेस ऑनलाइन झाली.
मी माझ्या शहरात परतली. येथे लॉकडाऊन सुरू झालं होतं. मी त्रासात असल्याचं पाहून जॉर्डने मला काही दिवस त्याच्यासोबत राहण्याची ऑफऱ दिली. हे ऐकून मी थोडी घाबरली. कारण मी त्याच्यासोहत कधीच एक आठवड्यांहून अधिक राहिली नाही.
जॉर्जने मला पैशांची मदत ऑफर केली, पण मी ते पैसे घेण्यास तयार नव्हती. मी त्याच्यासोबत जास्त काळ एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. हे दिवस प्रॅक्टिस रनप्रमाणे घ्यावा असाही विचार केला. मी त्याला म्हटलं की अंतिम परीक्षेपर्यंत मी येथे राहिनं आणि त्यानंतर निर्णय घेईन.
ज्याच्यासोबत आपण आयुष्य घालवणार आहोत, त्याची टेस्ट घेण्यासाठी कोरोनाचा काळ चांगला होता. सुदैवाने सर्व चांगल सुरू होतं. आम्ही घरातील कामं वाटून घेतली. तो स्वयंपाक करायचा मी भांडी घासायचे. अशा प्रकारे कामाची विभागणी करण्यात आली.
कोरोना काळात घर व आई-वडिलांपासून लांब असल्याने तणाव येत असे. मात्र यावेळी जॉर्ज मला आधार देत होता. आम्ही एकत्र शॉपिंग करीत होता, अर्थात छोट्या-मोठ्या गोष्टींवरुन वाद होत होता. पण आमचे लॉकडाऊनमधील दिवस चांगले चालले होते.
अशा प्रकारे 11 महिन्यांनतर आता मी त्याच्याशिवाय राहण्याचा विचारही करू शकत नाही. मी माझं शिक्षण पूर्ण केलं आहे. शिवाय मला इथे पार्ट टाइम नोकरीदेखील मिळाली आहे. त्यामुळे मी आता म्हणू शकते की जॉर्जने आपला प्रोबेशन पूर्ण केलं आहे.