
साऊथ वेल्स ( South Wales) येथे राहणारी डियोन सीबोर्न (Dion Seaborne) गेल्या काही महिन्यांपासून पाठीच्या दुखण्यामुळे त्रस्त होती. आणि जेव्हा तिचं दुखणं वाढलं तेव्हा ती ग्वेंट रुग्णालयात पोहोचली. येथे ती चाचणी करुन रिपोर्ट येण्याची वाट पाहत असताना अचानक तिच्या पोटात जोरात कळ आली.

पोटात गळ आल्यानंतर डियोन सीबोर्न रुग्णालयातील टॉलेटमध्ये पोहोचली. मात्र डियोनच्या वेदना वाढत होत्या आणि असं होण्यामागील कारणही तिला कळत नव्हतं. थोड्या वेळानंतर तिने पाहिलं की, गर्भातून बाळाचं डोकं बाहेर निघत आहे. हे पाहून ती खूप घाबरली आणि जोरजोरात ओरडू लागली.

डियोनने टॉयलेटमधूनच नर्सला आवाज दिला. मात्र कोणीच तिचा आवाज ऐकला नाही. त्यानंतर तिने आपला प्रियकर कैलम मॉरिसला कॉल केला आणि संपूर्ण घटना सांगितलं. यानंतर डियोनने टॉयलेटमध्येच मुलीला जन्म दिला.

माहिती मिळताच डियोनचा प्रियकर कैलम सकाळी 4 वाजता रुग्णालयात पोहोचला आणि आपल्या मुलीला पाहून खूृश झाला. डियोन म्हणते कैलमने येताच मुलीला उचलून घेतलं. आपण बाबा झालोय या गोष्टीवर त्याचा विश्वासच बसेना.

डियोनने सांगितले की तिला गर्भवती असल्याची माहिती नव्हती. आणि या दरम्यान तिचं वजनही वाढलं नव्हतं. काही लोकांनी सांगितलं की तिचं वजन कमी झालं होतं. गर्भकळांविषयी विचारल्यावर डियोन म्हणते की ती हे कधीच विसरू शकत नाही.




